‘धनंजय मुंडेंना तेव्हा मीच सांगितलेलं भाजप सोडू नका…’, अजित पवार का होतायेत ट्रोल?

मुंबई तक

ADVERTISEMENT

After Ajit Pawar's rebellion in NCP, now many people are trolling him based on an old story he told.
After Ajit Pawar's rebellion in NCP, now many people are trolling him based on an old story he told.
social share
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) बहुसंख्य आमदारांना सोबत घेऊन शरद पवारांसोबत (Sharad Pawar) बंडखोरी करणाऱ्या अजित पवारांवर (Ajit Pawar) आता अनेक जण टीका करत आहेत. तसेच फोडाफोडीचा राजकारणाला स्वत: अजित पवार यांचा कसा विरोध होता याचा एक किस्सा देखील आता समोर आला आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे खूप आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार होते.. पण आपणच त्यांना भाजप (BJP) सोडू नका असं बजावलं होतं. असं स्वत: अजित पवार म्हणाले होते. ज्याचा किस्सा सध्या खूप चर्चेत आला आहे. (ajit pawar rebellion ncp many people trolling him based on an old story he told bjp dhananjay munde gopinath munde sharad pawar maharashtra politics news marathi)

साधारण सहा वर्षांपूर्वी अजित पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीला एका मुलाखत दिली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या भाजप सोडण्याचा नेमका किस्सा सांगितला होता. तसेच शरद पवार यांच्यासोबतचे 50 आमदार सोडून गेले होते. तरीही ते उमेद हरले नव्हते असंही अजित पवार त्यावेळी म्हणाले होते. पण आता याच त्यांच्या किस्स्यावरुन अनेक जण त्यांना ट्रोलही करत आहेत.

त्यावेळी अजित पवार नेमकं काय म्हणालेले?

50 आमदार सोडून गेलेले तरी पवार साहेब नाउमेद नव्हते झाले!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘शरद पवारांसोबत 50 आमदार निवडून आले होते तेव्हा त्यांच्यासोबत फक्त 5 आमदार राहिले होते. 5 आमदार राहिले म्हणून पवार साहेब नाउमेद झाले नाहीत. पुन्हा साहेबांनी ताकद लावून त्यापेक्षा जास्त आमदार महाराष्ट्रात निवडून आणले. अशा प्रकारच्या घटना नेहमीच घडत असतात. चव्हाण साहेब जोपर्यंत सरकारमध्ये होते तो काळ आठवा. ज्यावेळेस त्यांचं सरकार गेलं.. चव्हाण साहेब विरोधी पक्षात होते. त्यावेळेस एअरपोर्टला वेलकम करायला किती लोक जात होते ते आठवा. आपण वडीलधाऱ्यांना आदराचं स्थान देतो ते आज नाहीए.;

‘आपण नेहमी चांगलं बोलतो ही आपली पंरपरा आहे. पण हे प्रत्येक वेळी घडतं. हे आताच घडतंय असं नाही.. पुढेही हे घडत राहणार आहे. यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. निश्चितपणे त्याची नोंद मी घेतली आहे. मी योग्य पद्धतीने विचार करून पावलं उचलेन.’ असं अजित पवार म्हणाले होते.

ADVERTISEMENT

‘सोडून गेलेले लोक परत आले तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवायचे नाही’

ADVERTISEMENT

‘सोडून गेलेले लोकं परत आले तर त्यांच्याकरिता दरवाजे उघडे ठेवणं हे बरोबर नाही. त्यापेक्षा जे निष्ठा ठेवून आपल्या बरोबर राहिले ते खरे आपले सहकारी आहेत. हे खरे आपले मावळे आहेत. हे तर शिवाजी महाराजांपासून चालत आलेलं आहे.’

‘शिवाजी महाराजांनी पण ज्यावेळेस रयतेचं राज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांच्याही जवळच्या लोकांनी त्यांना वेगळ्या पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न केलाच ना..’

हे ही वाचा >> NCP: ‘साहेबांचं वय काय बघता, डोकं तेच आहे..’, रोहित पवारांकडून अजितदादांना चॅलेंज

‘जर एखादी गोष्ट स्वच्छ झाली.. जर आपलं घर स्वच्छ झाल्यावर बरं वाटतं पाहायला देखील.. तसं साहजिकच वाटतं. पण काही लोकांसोबत आपले जवळकीचे संबंध असतात त्यावेळी देखील मनात विचार येतो की, इतके चांगल्या प्रकारे एक कुटुंब म्हणून वागणूक देत असताना देखील अशा काही व्यक्तीने नको जायला होतं असंही वाटतं.’ असंही अजित पवार म्हणाले होते.

‘तेव्हा धनंजय मुंडेंना सांगितलेलं की, भाजप सोडू नका…’

‘आता पंडीत अण्णा मुंडे हयात नाही. पण धनंजय मुंडेंना खाजगीत विचारा.. ज्या वेळेस धनंजय मुंडेंना आम्ही पक्षात घेतलं त्याआधी वर्ष दीड वर्ष आधी दिल्लीत पंडीत अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे हे आले होते. त्यावेळेस पवार साहेबांना त्यांनी सांगितलं होतं. त्यावेळी मीच त्यांना सांगितलं होतं की, तुम्ही मुंडे साहेबांना सोडू नका. तो पक्ष सोडू नका.. काही घटना घडतात. पण त्यातून पुन्हा चांगल्या पद्धतीने आपण बरोबर राहिलं पाहिजे. वर्ष, सव्वा वर्ष आम्ही घेतलं नव्हतं.’

‘वर्षानंतर ते पुन्हा भेटले ते म्हणाले तुम्ही जर घेणार नसाल तर आम्हाला दुसऱ्या पक्षाचा पर्याय शोधावा लागेल. आम्ही निर्णय घेतलेला आहे की, त्या पक्षात आम्हाला राहायचंच नाही. त्या पद्धतीने घडलं.’

हे ही वाचा >> बंड अजित पवारांचे, पण चर्चा शरद पवार अन् ‘त्या’ उद्योगपतीची; विषय काय?

‘आज आता मुंडे साहेब हयात नाहीत.. मुंडे साहेबांनी देखील भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यासोबत 5 आमदार पाशा पटेल, प्रकाश शेंडगे, माधुरी मिसाळ, पंकजा मुंडे आणि अजून कोण तरी होतं. दिल्लीत त्यांचा पक्षप्रवेश होणार, सगळं काही ठरलेलं असताना अचानक डॉ. मनमोहन सिंहजी त्या वेळेस म्हणाले त्यांना ज्यावेळेस सांगण्यात आलं वरिष्ठांकडून यांना पक्ष प्रवेश द्यायचाय. ते म्हणाले मी पंतप्रधान असताना लोकसभेतील उपनेते भाजपचे त्यांना पक्षप्रवेश दिलेला मला चालणार नाही. अशा पद्धतीने पक्ष फोडायचा नसतो.’

‘मग आता काय करायचं.. गाड्या तर सगळ्या आलेल्या.. मग त्यांनी सुषमा स्वराज यांच्याकडे गेले.. मग बहनजी बहनजी म्हणून समजावलं.. म्हणून त्या पक्षात राहिले. असं ते वातावरण त्या ठिकाणी करण्यात आलं.’ असा संपूर्ण किस्साच अजित पवारांनी त्यावेळी सांगितला होता.

आता अजित पवार यांनी स्वत: ज्या पद्धतीने पक्षात बंड केलं आहे त्यानंतर त्यांनीच सांगितलेला हा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामधून अनेक जण हे अजित पवारांना ट्रोलही करत आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT