NCP: अजितदादा आणि शरद पवारांसोबत किती आमदार?, ‘ही’ आकेडवारी बरंच काही सांगते!

मुंबई तक

ADVERTISEMENT

After Ajit Pawar's revolt in NCP, let us see the statistics of how many MLAs are with him and how many MLAs are with Sharad Pawar.
After Ajit Pawar's revolt in NCP, let us see the statistics of how many MLAs are with him and how many MLAs are with Sharad Pawar.
social share
google news

Maharashtra News Politics: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड करत थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर पक्षात मोठी फूट पडली आहे. असं असताना एकीकडे आपण म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस असा दावा अजित पवार यांनी केला आहे. तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्या गटाकडूनही खरी राष्ट्रवादी आपलीच असल्याचं म्हटलं जात आहे. असं असताना आता नेमका पक्ष कोणाचा या सगळ्याची मदार ही सध्या पक्षातील आमदारांवर (MLA) असणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की, कोणाकडे नेमके किती आमदार आहेत. (ajit pawar revolt ncp how many mla are with sharad pawar ajitdada party maharashtra politics news today)

ADVERTISEMENT

सगळ्यात आधी अजित पवार यांच्यासह कोणकोणत्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते पाहूयात:

  1. धनंजय मुंडे – परळी
  2. छगन भुजबळ – येवला
  3. दिलीप वळसे-पाटील – आंबेगाव
  4. आदिती तटकरे – श्रीवर्धन
  5. हसन मुश्रीफ – कागल
  6. अनिल पाटील – अमळनेर
  7. धर्मरावबाबा आत्राम – अहेरी
  8. संजय बनसोडे – उदगीर

अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार:

  1. सुनील टिंगरे – वडगाव शेरी
  2. निलेश लंके – पारनेर
  3. सुनील शेळके – मावळ
  4. संग्राम जगताप – अहमदनगर शहर
  5. अतुल बेनके – जुन्नर
  6. शेखर निकम – चिपळूण
  7. अशोक पवार – शिरूर
  8. दत्ता भरणे – इंदापूर
  9. सरोज अहिरे – देवळाली
  10. अण्णा बनसोडे – पिंपरी
  11. नरहरी झिरवाळ – दिंडोरी
  12. माणिकराव कोकाटे – सिन्नर
  13. इंद्रनील नाईक – पुसद
  14. दीपक चव्हाण – फलटण
  15. किरण लहामटे – अकोले

हे ही वाचा >> Exclusive: अमोल कोल्हे पवारांकडे परतले, सांगितली राजभवनातील Inside Story

यामुळे अजित पवार समर्थक आमदारांची एकणू संख्या ही आता 24 असल्याचे दिसत आहे. ज्यामध्ये 15 आमदार आणि 8 मंत्रिपदाची शपथ घेतलेले आमदार आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी अजित पवारांचं पारडं हे जड दिसत आहे. पण अद्यापही निवडून आलेल्या आमदारांच्या दोन तृतीयांश आमदारांची संख्या ही अजित पवारांकडे नाही. त्यामुळे त्यांच्या गटाची धाकधूक कायम आहे.

शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदार:

  1. जयंत पाटील – वाळवा
  2. जितेंद्र आव्हाड – मुंब्रा
  3. अनिल देशमुख – काटोल
  4. रोहित पवार – कर्जत-जामखेड
  5. प्राजक्त तनपुरे – राहुरी
  6. संदीप क्षीरसागर – बीड
  7. दौलत दरोडा – शहापूर
  8. नवाब मलिक – अणुशक्तीनगर
  9. मकरंद पाटील – वाई
  10. मानसिंग नाईक – शिराळा
  11. बाळासाहेब पाटील – कराड उत्तर
  12. सुमनताई पाटील – तासगाव
  13. सुनील भुसारा – विक्रमगड
  14. चेतन तुपे – हडपसर

शरद पवार यांचे एकूण 14 समर्थक आमदार या घडीला आहेत. मात्र यामध्ये वाढ होते की घट होते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

शरद पवार किंवा अजित पवार या दोघांपैकी सध्या कोणाच्याही सोबत नसलेले राष्ट्रवादीचे आमदार:

  1. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राज
  2. राजेंद्र कारेमोरे – तुमसर
  3. मनोहर चंद्रिकापुरे – अर्जुनी मोरगाव
  4. चंद्रकांत नवघरे – वसमत
  5. राजेश टोपे – घनसावंगी
  6. नितीन पवार – कळवण
  7. दिलीप बनकर – निफाड
  8. दिलीप मोहिते – खेड आळंदी
  9. आशुतोष काळे – कोपरगाव
  10. प्रकाश सोळंखे – माजलगाव
  11. राजेश पाटील – चंदगड
  12. यशवंत माने – मोहोळ
  13. बबन शिंदे – माढा
  14. बाबासाहेब पाटील – अहमदपूर
  15. बाळासाहेब आजबे – आष्टी

हे ही वाचा >> NCP: जयंत पाटील, आव्हाडांबाबत अजित पवारांनी घेतला प्रचंड मोठा निर्णय

अजित पवार यांच्यासोबत जावं की शरद पवार यांच्यासोबतच राहावं अशा संभ्रमात असलेल्या आमदारांची एकूण संख्या 15 आहे. याच आमदारांवर आता दोन्ही पवारांची खरी भिस्त आहे. कारण निवडून आलेल्या एकूण आमदारांच्या दोन तृतीयांश आमदार जर बाहेर पडले तर त्यांना पक्षांतर बंदी कायदा हा लागू होणार नाही. पण तसं झालं नाही तर मात्र, आता बाहेर पडलेल्या आमदारांची आमदारी धोक्यात येऊन त्यांना पुन्हा निवडणुकींना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे आता या काठावर असलेल्या आमदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा दोन्ही बाजूकडील गटाचा सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT