NCP पक्ष मिळविण्यासाठी अजित पवारांची नवी चाल, पडद्यामागे छगन भुजबळांची खेळी!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ajit Pawar has started trying to get NCP party in the same way as Eknath Shinde got Shiv Sena party. In all this, it has come to light that Chhagan Bhujbal is helping Ajit Pawar behind the scenes.
Ajit Pawar has started trying to get NCP party in the same way as Eknath Shinde got Shiv Sena party. In all this, it has come to light that Chhagan Bhujbal is helping Ajit Pawar behind the scenes.
social share
google news

Maharashtra News Politics: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाची काल (5 जुलै) मुंबईतील वांद्रेमध्ये बैठक पार पडली आहे. ज्यामध्ये अजित पवाराची आक्रमक वृत्ती पुन्हा पाहायला मिळाली. यावेळी अजित पवार यांनी चक्क शरद पवारांचे (Sharad Pawar) वय झाले असून आता त्यांनी राजकारण सोडून द्यावं असं विधान केलं. अजित पवार समर्थकांना उद्देशून म्हणाले की, ‘पवारसाहेब तुम्ही 83 वर्षांचे झाले आहात, तुम्ही कधी थांबणार की नाही?, आम्ही सरकार चालवू शकतो, आमच्याकडे सत्ता आहे, मग आम्हाला संधी का मिळत नाही, 60 वर्षांनंतर कोणत्याही घरात निवृत्त होऊन आशीर्वाद देण्याचे काम करतात, मग तुम्ही तेच का करत नाही?’ असं मोठं विधान अजित पवारांनी केलं होतं. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने बोलावलेली ही बैठक पक्षप्रमुख म्हणून ताकद दाखविण्यासाठी होती अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (ajit pawar trying get ncp party same way as eknath shinde got shiv sena chhagan bhujbal sharad pawar latest update on maharashtra politics)

ADVERTISEMENT

इतकेच नव्हे तर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) ज्या संस्थेचे विश्वस्त आहेत, त्याच संस्थेच्या वांद्रे येथील एमईटी संस्थेच्या आवारात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. राज्यभरातील राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. याच ठिकाणी 100 रुपयांच्या बाँड पेपरवर नोंदणीसाठी जिल्हावार काउंटरची व्यवस्था करण्यात आली होती. ज्यामध्ये प्रत्येक नेत्याला पक्षातील आपले स्थान, नाव, वय आणि आधार कार्ड क्रमांकाचा तपशील द्यावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य असल्याचेही या नेत्यांनी प्रतिज्ञापत्रात लिहिले आहे.

शपथपत्रात अजित पवार यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा पक्ष आणि चिन्हावर दावा केला जाईल तेव्हा ही शपथपत्रे भारतीय निवडणूक आयोगाकडे (ECI) शरद पवार गटाच्या विरोधात आपली ताकद सिद्ध करण्यासाठी अजित पवारांचा गट सादर करेल. या बैठकीपूर्वी अजित पवार गटाला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनाही एका शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले होते, ते देखील निवडणूक आयोगाला आता सादर करण्यात येईल. ज्यामध्ये अजित पवार यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नमूद करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा>> Politics Of Maharashtra : शरद पवार कुठे चुकले? छगन भुजबळांचा दुसरा हल्ला

अजित पवारांनी ‘त्या’ आमदारांची घेतली वैयक्तिक भेट

सभेपूर्वी छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ असे सर्व ज्येष्ठ नेते हे व्यासपीठाच्या मागे भेटले. त्यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. अजित पवार यांच्याकडे त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची यादीही होती. यादरम्यान अजित पवार यांनी प्रत्येक आमदाराला वैयक्तिकरित्या बोलावून घेतले. जे सकाळी 11 वाजेनंतरही सभेच्या ठिकाणी पोहोचू शकलेले नव्हते.

पावसाळी अधिवेशनापूर्वी पूर्ण होतील मागण्या

दरम्यान, दक्षिण मुंबईचे तालुकाप्रमुख गणेश आडिवेकर यांनी दावा केला की, या बैठकीला पक्षाच्या सर्व स्तरातील आणि जिल्हा ते तालुका पातळीवरील आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदारांसोबत बैठक झाली ज्यात वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या मतदारसंघातील सर्व प्रश्न मांडण्याचे निर्देश दिले. तसेच 17 जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाहीही देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ‘राजीनामा कसा देतात, हे आम्ही…’, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर सामंत काय बोलले?

अजित पवार गटाचा दावा – 34 आमदार (विधानसभा) आणि 4 आमदार (खासदार) बैठकीला होते हजर

बैठकीनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी दावा केला की, आजच्या बैठकीला विधानसभेचे 34 आमदार आणि विधान परिषदेचे 4 आमदार उपस्थित होते. याशिवाय 4 ते 5 आमदारांशी फोनवरून संपर्क साधण्यात आला आहे. त्यांनी अजित पवारांच्या गटाला पाठिंबा दिल्याची देखील पुष्टी केली आहे. अजित पवार यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा ठराव सुमारे 40 आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT