“अजितदादाचे मूडस्विंग फक्त…”, सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीसांना काय दिलं उत्तर?
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे (supriya sule) आणि प्रफुल पटेल यांची निवड केली. या निवडीनंतर राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना डावलल्याची किंवा ते नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आले होते.
ADVERTISEMENT
Maharashtra Politics : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे (supriya sule) आणि प्रफुल पटेल यांची निवड केली. या निवडीनंतर राजकीय वर्तुळात विरोधी पक्षनेते अजित पवार यांना डावलल्याची किंवा ते नाराज असल्याच्या चर्चांना ऊत आले होते. अजित पवार (Ajit pawar) यांच्या नाराजीच्या चर्चावर आता सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीसांवर टीका केली आहे.(ajit pawar upset speculation ncp supriya sule criticize bjp shinde government)
ADVERTISEMENT
दादांचे मुडस्विंग फक्त भाजप आणि शिंदे सेनेलाच कळतात, शेवटी आंब्याच्याच झाडालाच दगड मारणार ना, बाभळीला कोण मारत का? असा टोला देखील सुप्रिया सुळे (supriya sule) यांनी लगावला. दादांवर आणि राष्ट्रवादीवर टीका केल्याशिवाय भाजपकडे दुसरा मार्गच नाही आहे. कारण दुसरं आमच्या विरोधात बोलण्यासारख त्यांच्याकडे काही उरलं नाही आहे. त्यामुळे दादाला टार्गेट करा, मला टार्गेट करा किंवा राष्ट्रवादीला टार्गेट करा, असा भाजप-शिंदे प्लान असल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले.
हे ही वाचा : Ajit Pawar : शरद पवारांची ‘ती’ घोषणा; अजितदादा काहीच न बोलता निघून गेले; नंतर…
सुप्रिया सुळेंच्या (supriya sule) कार्यकारी अध्यक्षपदी निवडीसाठी अजित दादांनी लॉबिंग केल्याची चर्चा आहे.यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, हा पक्ष लॉबिंगने चालत नाही तर चर्चेतून चालतो. हा लोकशाहीवाला पक्ष आहे. त्यामुळे जे काही निर्णय राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात होतात, ते सगळ्यांना विचारात घेऊन आणि चर्चा करूनच होतात,असे त्यांनी सांगितले. तसेच दादांच्या पक्षातील जबाबदारी प्रश्न विचारला असता, सुप्रिया सुळे म्हणाल्या, दादा हा महाराष्ट्रातला विरोधी पक्ष नेता आहे. त्यांचे पद हे मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीचे असते. राज्याचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षाचा रोल खुप मोठा असतो, असे त्यांनी सांगितले.
हे वाचलं का?
पक्षात फुट पडणार का?
सुप्रिया सुळे (supriya sule) यांच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवडीनंतर पक्षात फुट पडण्याची चर्चा आहे. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुठल्या घटनांमध्ये असे अधोरेखीत झाले आहे. मला उदाहरण द्या असे त्यांनी उलट पत्रकारांना सांगितले. ग्लास अर्धा आहे की फुल आहे हे तुम्हाला ठरवायंच आहे, तुम्हाला गॉसीपच करायच, म्हणजे तुम्हाला वास्तवतेपासून दुर राहायचं आहे, त्यामुळे मी का स्पष्टीकरण देऊ असे देखील सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
कॅगच्या रिपोर्टवर काय म्हणाल्या?
ओडिशामध्ये जो अपघात झाला, तो पूर्णपणे रेल्वे मंत्रालयाच्या दुर्लक्षामुळे झाला, असा कॅगचा रिपोर्ट सांगतोय. मी काय विरोधात आहे, म्हणून सांगत नाही, असे सुप्रिया सुळे (supriya sule) म्हणाल्या. 288 लोकांचे मृत्यू होतात, तेव्हा त्याची जबाबदारी केंद्र सरकारला घ्यायला नको, अशी संतप्त टीका देखील त्यांनी यावेळी केली. वंदे भारत ट्रेन आल्या त्याचे स्वागत आहे, पण इतक्या वंदे भारत ट्रेन आणण्याची खरंच गरज होती का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच सुरक्षितता पहिली मग वंदे भारत ट्रेन, दोन-चार ट्रेन झाल्या त्याचे मी स्वागत केले? मग गरीबरथ का नाही वाढवल्या ? रेल्वे ट्रॅकवर पैस का नाही खर्च केले? सिग्नलवर पैसै का नाही वापरले? असे अनेक सवाल सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला केले आहेत.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Chandrashekhar Bawankule: “शरद पवारांनी षडयंत्र सुरू केले आहे, कारण…”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT