Ajit Pawar : शरद पवारांची ‘ती’ घोषणा; अजितदादा काहीच न बोलता निघून गेले; नंतर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

sharad pawar ncp working president supriya sule praful patel ajit pawar upset twitter post maharashtra politics
sharad pawar ncp working president supriya sule praful patel ajit pawar upset twitter post maharashtra politics
social share
google news

NCP Sharad Pawar: नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 25 व्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात शरद पवारांनी (Sharad Pawar) पक्षातील भाकरी फिरवली. यावेळी दोन मोठे निर्णय शरद पवारांनी जाहीर केले. यावेळी बोलताना शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवड केली असल्याचं जाहीर केलं. याच वेळी मंचावर राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि शरद पवारांची पुतणे अजित पवार (Ajit Pawar) हे देखील हजर होते. (sharad pawar ncp working president supriya sule praful patel ajit pawar upset twitter post maharashtra politics)

शरद पवारांनी अचानकपणे जी घोषणा केली त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान, हा कार्यक्रम संपल्यानंतर प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीतील इतर अनेक नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मात्र, नेहमी मीडियाशी हसत-खेळत बोलणारे आणि सविस्तर माहिती देणारे अजित पवार हे काहीही न बोलताना आपल्या गाडीत बसून निघून गेले.

खरं तर माध्यमांनी त्यांना या घोषणेबाबत त्यांची काय प्रतिक्रिया आहे याची विचारणा देखील केली. मात्र, याबाबत एकही शब्द न उच्चारता अजित पवार हे गाडीत बसून थेट निघून गेले. ज्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आणि राजकीय वर्तुळात लागलीच उलटसुलट चर्चा सुरू झाल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Sanjay Raut: ‘शिंदेंमध्ये शिवसेना फोडण्याची ताकदच नव्हती, शाहा आता त्यांना नष्ट करतील’

दरम्यान, अगदी काही वेळातच अजित पवारांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांचं अभिनंदन केलं. यावेळी अजित पवारांनी असंही म्हटलं की, ‘शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल.’

अजित पवार मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर बोलले नाही पण ट्विटरवरुन अभिनंदन केलं!

खरं तर अजित पवार मीडियाशी याविषयी काही तरी बोलतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र, एकही वाक्य न बोलता ते निघून गेले होते. पण त्यानंतर त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये ते म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार प्रफुल्लभाई पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसंच खासदार प्रफुल्लभाई पटेल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार सुनिल तटकरे, डॉ. योगनानंद शास्त्री, के.के. शर्मा, पी.पी. महोम्मद फैजल, नरेंद्र वर्मा, जितेंद्र आव्हाड, एस. आर. कोहली, नसीम सिद्दकी या सहकाऱ्यांना पक्षांतर्गत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. या सर्व सहकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन! आदरणीय साहेबांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत दिलेल्या जबाबदाऱ्या सर्व सहकारी यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास आहे.’

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Mira Road Murder: ‘HIV पॉझिटिव्ह, शारीरिक संबंध…’ मनोज साने प्रचंड चाणाक्ष आरोपी!

‘आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली ‘हृदयात महाराष्ट्र… नजरे समोर राष्ट्र…’ हा विचार घेऊन रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशाच्या आणि राज्याच्या जडण-घडणीत मोलाचं योगदान देईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी याच ध्येयानं कामं करतील हा विश्वास आहे. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं पुन:श्च अभिनंदन!’ अशी पोस्ट शेअर करत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचं अभिनंदन केलं आहे.

ADVERTISEMENT

मात्र, माध्यमांशी न बोलता अजित पवार ज्या पद्धतीने निघून गेले त्यामुळे राजकीय वर्तुळात एका नव्या चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे आता पुढील काळात अजित पवार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT