NCP : अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट लिहिली गेली होती एप्रिलमध्येच?
अजित पवार थेट विरोधी पक्षनेतेपदावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांची ही खेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धक्का असल्याचे म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT

Maharashtra Political Crisis 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीची चर्चा नेहमीच होते. ते कधी कुणाला धक्का देतील, हे सांगता येत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. मात्र, रविवारी पॉवर गेममध्ये अजित पवारांनी त्यांना मोठा धक्का दिला आणि पुतण्याच्या गुगलीने काका क्लीन बोल्ड झाले. 2 जुलै रोजी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. राजकारणाचे चाणक्य म्हणवणाऱ्या शरद पवारांना पुतणे अजित पवार यांनी पुन्हा एकदा झटका दिला. अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या 8 आमदारांनी शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. (Had Ajit Pawar written the script of rebellion months in advance?)
हे सर्व इतक्या झटपट घडले की तासाभरात अजित पवार थेट विरोधी पक्षनेतेपदावरून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. त्यांची ही खेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना धक्का असल्याचे म्हटले जात आहे. इतर विरोधी पक्षांनाही या राजकीय भूकंपाने आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण, विरोधी पक्षनेते म्हणून अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची त्यांच्या घरी बैठक बोलावली होती. मात्र, नंतर त्यांनी थेट राजभवन गाठले. यावेळी त्यांच्यासोबत 18 आमदारही उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही राजभवनात आधीच उपस्थित होते. नंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 8 आमदारांसह मंत्री म्हणून शपथ घेतली आणि शिवसेना-भाजप युतीच्या सरकारचा भाग बनले.
अजित पवारांच्या बंडाची स्क्रिप्ट 27 एप्रिललाच लिहिली गेली होती का?
आता असे प्रश्न पुढे येऊ लागले आहेत की, शरद पवारांसारख्या दिग्गज नेत्याला आपल्याच पक्षात एवढे मोठे बंड होईल याची कुणकुण का लागली नाही. दुसरीकडे अजितदादांनी काका शरद पवार यांच्याकडून बंडखोरीचा प्लान आधीच तयार करून घेतला होता का? ही स्क्रिप्ट फार आधीपासूनच लिहिण्यास सुरूवात झाली होती का? कारण, शरद पवार यांनी 27 एप्रिल रोजी दिलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचं विधान केलं होतं. या विधानानेच महाराष्ट्रातील राजकारण चांगलं तापलं होतं.
वाचा >> Ajit Pawar : भाजपने महाराष्ट्रात केला ‘करेक्ट कार्यक्रम’, एकाच दगडात मारले दोन पक्षी
इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने अजित पवारांना भाकरी म्हणत शरद पवार आता अजित पवारांना बाजूला करणार असल्याचे म्हटलं होतं. त्या काळापासून अजित पवारांकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सातत्याने डोकं वर काढत होती. यावर भाजप आणि शिंदे गटही टिंगल करताना दिसत होता. दुसरीकडे बंडखोरीनंतर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष आणि बंडखोर नेते प्रफुल्ल पटेल यांनीही जे काही घडले आहे, त्याबाबत आधीच चर्चा सुरू होती आणि त्याबाबत नियोजनही सुरू असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.