अजित पवारांवर निधी न दिल्याचा आरोप, अमोल मिटकरींचं शिंदेंच्या आमदारांना उत्तर
अजित पवार निधी देत नसल्याचे एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांच्या बंडखोरीचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले होते. शिंदेच्या आमदारांनी अजित पवारांवर केलेले आरोप आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी फेटाळले आहेत.
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बंडखोरीला नुकतंच वर्ष पुर्ण झाले आहे. या वर्षभरापूर्वीच्या घडामोडीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी अजित पवार निधी देत नसल्याचा आरोप केला होता. मुळात अजित पवार निधी देत नसल्याचे एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांच्या बंडखोरीचे प्रमुख कारण असल्याचे समोर आले होते. शिंदेच्या आमदारांनी अजित पवारांवर केलेले आरोप आता राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी फेटाळले आहेत. (allegation on ajit pawat non-payment of funds amol mitkari’s reply to shinde’s mla)
अजित दादांनी आमदारांमध्ये कधीच दुजाभाव केला नाही. बऱ्यापैकी निधी दिला होता. स्वत: शहाजी बापूंनी सांगितले होते की आम्हाला अजित दादांनी भरभरून फंड दिला होता,असे उत्तर अमोल मिटकरी यांनी देत शिंदेंच्या आमदारांचा आरोप फेटाळला आहे.
अजित दादांनी 2 कोटीचा निधी 5 कोटीवर नेला, त्यात आमदाराचे भागणारच नव्हतं. हेच भाजपमध्ये जे आमदार असतील,शिंदे गटात जे आमदार असतील त्यांना झुकते माप असायचे. त्या तुलनेत विरोधकांना निधी मिळत नव्हता. मला अजूनही एक रूपया मिळाला नाही जिल्हा नियोजनचा असे अमोल मिटकरी म्हणतात.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा :Exclusive: भाजपसोबत घरोबा, अमोल मिटकरी म्हणतात, ‘RSS ची विचारधारा मरेपर्यंत…”
अजित दादांनी बऱ्यापैकी निधी दिला होता. आमदारांमध्ये कधीच दुजाभाव केला नाही. स्वत: शहाजी बापूंनी सांगितले होते की आम्हाला अजित दादांनी भरभरून फंड दिला होता. गुवाहाटीला जाण्यापुर्वी शहाजीबापूच्या निधीचा जो आकडा होता. तो आम्ही भरसभेत जाहिर केला होता. त्या भागामध्ये सांगोला मतदार संघात त्यांना निधी बऱ्यापैकी दिला होता हे वास्तव आहे, असे देखील अमोल मिटकरी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेवर अमोल मिटकरी म्हणाले, गटनेता म्हणून अजित दादांना आमदारांनी गळ घातली. सत्तेतल्या लोकांसोबत जाऊन मतदार संघासाठी निधी जर आणता आला तर पुढच्या निवडणूका सोप्या जातील. त्यामुळे आमदारांनी केलेल्या विनवण्या आणि गटनेता या नात्याने सगळ्याच आमदारांसाठी अजित दादांनी हा निर्णय घेतल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
विचारधारेवर मिटकरी काय म्हणाले?
माझी विचारधाराही शिव, शाहु, फुले, आंबेडकरांची विचारधारा आहे. आरएसएस विरोधातली माझी विचारधारा मी गेल्या 20 वर्षापासून सातत्याने मांडत आलो आहे. मी ती विरोधातली विचारधारा अजूनही सोडलेली नाही. तसेच आरएसएसची विचारधारा मरेपर्यंत स्विकारणार नाही, जिथे विरोध होता तिथे विरोध कायम राहणार असल्याचे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्या अजित दादांनी मला संधी दिली.त्या अजित दादांनी कुठलीही भूमिका घेतली आहे.त्या भूमिकेला माझे समर्थन असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले आहेत.
हे ही वाचा :Pawar Family: अजितदादांच्या बंडानंतर पक्ष, पवार कुटुंबात फूट पण ‘इथे’ मात्र सगळे एकत्र!
ADVERTISEMENT