Anil Deshmukh: "वा... देवेंद्र फडणवीस जी! तुम्ही 15 दिवस का शांत होता?"
Anil Deshmukh News : अनिल देशमुख यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन वाझे, परमबीर सिंग पोपटासारखे बोलतायत अशी टीका केली.त्याचसोबत देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होतात? असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

फडणवीसांच्या सांगण्यावरून वाझे, परमबीर सिंग पोपटासारखे बोलतात

परमबीर सिंग भाजपाला शरण गेला

देवेंद्र फडणवीस यांच्या सांगितण्यावरून आरोप करतात
Anil Deshmukh Reply Devendra Fadnavis : राज्यातील आजी माजी गृहमंत्र्यांमला वाद शमता शमत नाही. रोज नवीन ट्विस्ट आणि आरोपांचा बॉम्ब हा फुटतच असतो. अशात शनिवारी परमबीर सिंह यांनी आरोपांचा नवीव बॉम्ब फोडला होता. यामध्ये त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरी बैठका व्हायच्या. या बैठकीत फडणवीसांसह भाजपच्या अनेक नेत्यांना अटक करण्याचा प्लॅन होता,असा आरोप करून परमबीर सिहांनी (Parambeer Singh) खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ''मला अटक करण्या संदर्भात आणि भाजप नेत्यांना अटक करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलेले आहे ते पूर्णपणे सत्य'' असल्याचे विधान केले होते. या विधानानंतर आता अनिल देशमुखांची प्रतिक्रिया समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होतात? आणि आता माझ्यावर आरोप करावयाचे तुम्हाला आठवले काय ? असा सवाल देशमुखांनी केला आहे. (anil deshmukh reply devendra fadnavis and parambeer singh on new allegation maharashtra politics)
अनिल देशमुख यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरुन वाझे, परमबीर सिंग पोपटासारखे बोलतायत अशी टीका केली.त्याचसोबत देवेंद्र फडणवीस, तुम्ही 15 दिवस का शांत होतात? असा सवाल देशमुखांनी उपस्थित केला आहे.
हे ही वाचा : Mumbai tak Baithak 2024 Schedule: विधानसभेआधी उडणार धुरळा! ‘मुंबई Tak बैठक’मध्ये 'हे' दिग्गज मांडणार व्हिजन
देशमुखांचं ट्विट जशाचं तसं...
वा... देवेंद्र फडणवीस जी!
मी 15 दिवसापुर्वी, तुम्ही 3 वर्षापुर्वी कसे श्री.उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना तुरुगांत टाकण्यासाठी कटकारस्थान रचले होते, ते मी महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले. आता तुम्ही माझ्यावर आरोप करण्यासाठी सचिन वाझे जो देशद्रोहाच्या व 2 खुनाच्या गुन्ह्यांमध्ये 3 वर्षापासुन जेलमध्ये आहे, तसेच परमबीर सिंगने 3 वर्षापुर्वी उद्योगपती श्री.मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्कार्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवले आणि नंतर स्कार्पिओ गाडीच्या मालकाची हत्या करणे, या दोन्ही गुन्हाचा सुत्रधार आहे. अशा आरोपी परमबीर सिंग याला पुढे केले आहे.