Ashok Chavan : काँग्रेसला हादरे! नाव चर्चेत असणाऱ्यांनी आमदारांनी सांगितलं मनात काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

ashok chavan join bjp today devendra fadnavis what is the role of mlas congress maharashtra politics
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.आज दुपारी 12 वाजता ते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार

point

हे आमदार काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार

point

चव्हाणांच्या राजीनाम्यावर आमदारांची प्रतिक्रिया काय?

Former maharashtra cm Ashok Chavan join bjp : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे.आज दुपारी 12 वाजता ते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या दरम्यान चव्हाणां पाठोपाठ आणखी 12 ते 14 आमदार काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा आहे. यामधील अनेक आमदार चव्हाणांच्या जवळचे आहेत. अशा परिस्थितीत चव्हाणांच्या (Ashok Chavan)  राजीनाम्यानंतर हे आमदार काय भूमिका घेतात? तसेच या आमदारांची चव्हाणांच्या राजीनाम्यावर काय प्रतिक्रिया आहे? हे जाणून घेऊयात. (ashok chavan join bjp today devendra fadnavis what is the role of 14 mlas congress maharashtra politics) 

ADVERTISEMENT

'आम्ही अशोक चव्हाणांसोबतच' 

नांदेड दक्षिण मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांनी चव्हाण यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रीया दिली आहे. अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण आमचे नेते आहेत. अशोक चव्हाण यांनी फक्त राजीनामा दिला आहे, अद्यापही अशोक चव्हाण हे कोणत्या पक्षासोबत जातील याची माहित नाही. परंतू आम्ही अशोक चव्हाणांसोबतच आहोत, असे मोहन हंबर्डे यांनी सांगितले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ...म्हणून मी काँग्रेस सोडली; अशोक चव्हाणांनी सोडलं मौन

 'कार्यकर्त्याना विचारून निर्णय घेणार'

ADVERTISEMENT

हदगाव मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगाकर यांनी देखील या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे. आता ते कोणा ोबत जातील तेव्हा मी माझ्या कार्यकर्त्यासोबत विचारपूस करून निर्णय घेईन, असे माधवराव पाटील जवळगाकर म्हणालेत. मला कार्यकर्त्यांनी निवडून दिले आहे, आणि मी जे काही निर्णय घेणार कार्यकर्त्यासोबत विचारून निर्णय घेणार आहे. मी मुंबईला चाललोय माझा नियोजित दौरा होता. चव्हाण साहेब जर भेटले तर  मी त्यांची भेट घेणार आहे, असे  आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

'माझ्या रक्तात शेवटपर्यंत काँग्रेस'

दरम्यान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील चव्हाणांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या रक्तात शेवटपर्यंत काँग्रेस आहे. माझी तत्त्व भाजपसोबत जुळत नाहीत. माध्यमांमधल्या बातमीला तथ्य नाही, असे प्रणिती शिंदे यांनी सांगत त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा फेटाळल्या. 

'त्या यादीचा माझ्यासी काही संबंध नाही'

आमदार कुणाल पाटील अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर म्हणाले की, ज्या नावांची चर्चा होतेय. जी यादी फिरतेय त्याच्याशी माझा काही संबंध नाही. माझा पक्ष सोडण्याचा कोणताही विचार नाही. मी बैठकीला मुंबईत जाणार आहे, असे पाटील यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Congress: चव्हाणांचा राजीनामा, राज्यसभेचं गणितच बिघडलं!

माझ्या नावाची चर्चा करणं चुकीचं आहे. माझा याच्याशी काहीही संबंध नाही. मी कोल्हापुरातला आमदार आहे. आमच्या इथं बंटी पाटील साहेब आहेत. माझं नवा कसं काय आलं माहिती नाही. मी काय काँग्रेस सोडून कुठे जात नाही, असे आमदार राजू आवळे यांनी सांगितले. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी नुकताच अजित पवार गटात प्रवेश केला होता. या प्रवेशानंतर झिशान सिद्दीकीही अजित पवार गटात जातील अशी चर्चा होती. मात्र या चर्चा त्यांनी फेटाळल्या होत्या. त्यात आता चव्हाणांच्या राजीनाम्यावर देखील झीशान सिद्दिकी काँग्रेसची साथ सोडतील अशी चर्चा होती. यावर झिशान सिद्दीकी म्हणाले, मी सध्या काँग्रेस पक्षासोबत आहे. मी पक्ष सोडत नाही. 

मी माझा पक्ष सोडून कुठंही जाणार नाही. मी आहे तिथंच आहे. जे गेलेत त्यांना विचारा आणखी कोण सोडून चाललंय ते आमदार संग्राम थोपटे यांनी भूमिका मांडली आहे. 

दरम्यान अर्ध्याहुन जास्त आमदारांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तरी काही आमदार अशोक चव्हाणांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहे. चव्हाणांच्या निर्णयानंतर हे आमदार आपली भूमिका घेणार आहेत. 
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT