‘मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन’, विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं मोठं विधान
राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचा दर्जा दिला होता. तर 16 आमदारांच्या अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देतील असे सुप्रीम कोर्टाने सुनावणीत म्हटले होते.
ADVERTISEMENT
Politics of Maharashtra : राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाला शिवसेनेचा दर्जा दिला होता. तर 16 आमदारांच्या (16 MLas Disqualification) अपात्रतेचा निर्णय़ विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर सोपवला होता. यानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाकडे लागले होते. त्यात आता याच प्रकरणात राहुल नार्वेकर यांनी सुचक विधान केले आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असे मोठं विधान राहुल नार्वेकर यांनी केले आहे. या त्यांच्या विधानाची आता राजकिय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांच्यावरील ‘दौलत’ या चरित्र ग्रंथाच्या प्रकाशन सोहळा आज पार पडला. या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केलेल्या भाषणात राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या निलंबनाबाबत मोठं विधान केले आहे. ‘मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन’, असे विधान राहुल नार्वेकर यांनी केले आहे. बाळासाहेब देसाई यांच्या निर्णय क्षमतेबाबत भाष्य करताना नार्वेकर यांनी हे विधान केलं होते. राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्या या विधानावरून आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाचा आता उद्धव ठाकरे यांना फायदा होणार की तोटा होणार ? हे येणाऱ्या काळात कळणार आहे.
हे ही वाचा : उद्धव ठाकरेंचे मेहुणे पुन्हा अडचणीत, आता कोणती कारवाई?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने 11 मे रोजी निकाल दिला होता. या निकालानुसार शिंदे सरकार कायम राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. मात्र, यावेळी कोर्टाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांवर सोपवला होता. पण यासाठी कोणतीही कालमर्यादा ठरविण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष कधी घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
दरम्यान राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) मध्यंतरी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. राजकीय पक्ष, व्हीप आणि आमदार अपात्रता याबाबतचा निर्णय हा लवकरात लवकर घेतला जाईल. पण त्यासाठी सगळे नियम पाळले जातील. याबाबत राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं की, ते 16 आमदार नाही तर 54 आमदारांबाबत निर्णय घेणार आहेत. कारण त्यांच्याकडे 5 याचिका दाखल झाल्या असून त्यात शिवसेनेच्या एकूण 54 आमदारांची नावं आहेत. त्यामुळे या सगळ्यांबाबत ते निर्णय घेणार आहेत.
हे ही वाचा : Marine Drive : मुंबईत तरूणीचा विवस्त्र मृतदेह, अजित पवार सरकारवर खवळले
ADVERTISEMENT