मनसे नेते अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी; प्रकरण काय?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
अविनाश जाधव यांना जीवे मारण्याची धमकी
social share
google news

Avinash Jadhav Threat Call : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. या संबंधित व्हिडिओही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अविनाश जाधवच्या (Avinash Jadhav Threat Call) फोटोला क्रॉस करून ”आम्ही त्याला जीवंत सोडणार नाही, शोधून शोधून मारू”, अशा आशयाची धमकी देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहिममधील अनधिकृत मजार हटविण्याची मागणी केली होती.यानंतर अविनाश जाधव यांनी देखील मुब्रातील अनधिकृत दर्गा हटविण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर अविनाश जाधव यांना ही धमकी देण्यात आल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी आता नौपाडा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(avinash jadhav death threat call mns leader what is the case)

ADVERTISEMENT

गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी लाव रे तो व्हिडिओमध्ये माहिमच्या खाडीत बांधलेल्या अनधिकृत मजारचा व्हिडिओ दाखवला होता. जर यावर महिन्याभरात कारवाई झाली नाही,तर त्याच्याबाजूला गणपती मंदीर उभारू, असा इशाराच सरकार आणि पोलिस प्रशासनाला दिला होता. राज ठाकरेंच्या या इशाऱ्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी अनधिकृत मजार हटवण्यात आली होती. या घटनेनंतर मनेसेच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यातील अनधिकृत दर्ग्याच्या प्रश्न उपस्थित केला होता.

‘कोणाचीही सत्ता असो आपण पक्के’, अब्दुल सत्तारांच्या विधानानंतर अनेकांच्या भुवय्या उंचावल्या

हम उसे ढुंड ढुंड के मारेगे…

राज ठाकरेनंतर मनसे नेते अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांनी मुंब्रा येथील वनखात्याच्या जागेवरील अनधिकृत दर्ग्याच्या प्रकार समोर आणला होता. तसेच याप्रकरणी 15 दिवसात कारवाई करण्याचा अल्टीमेटम देखील प्रशासनाला दिला होता. या अल्टीमेटमनंतर त्यांना धमकी देण्यात आली आहे. एका व्हिडिओ क्लिपद्वारे त्यांना धमकी दिली गेली आहे. या धमकीची क्लिप व्हायरल होत आहे. हम उसे जिंदा नही छोडेंगे…कोई गुस्ताख छुप न पाएगा…हम उसे ढुंड ढुंड के मारेगे..अशा आशयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एस आर कमिटी बॉयकॉट अविनाश जाधव असे देखील व्हिडिओत म्हटले आहे. या व्हिडिओनंतर मनसैनिक आक्रमक झाले आहेत.

हे वाचलं का?

Ajit Pawar : “तेव्हा मलाही वेदना व्हायची की, काय बोलण्याची पाळी येतीये”

पोलिसात गुन्हा दाखल

दरम्यान या प्रकरणी मनसे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. अविनाश जाधव याला मारून टाकून, उसको छोडेंगे नही असा तो व्हिडिओ व्हायरल झालाय. या प्रकरणी रितसर तक्रार केली. तक्रारीनंतर गुन्हा देखील दाखल केला आहे. अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्या पोलिस प्रोटक्शनसाठी अर्ज केलाय, असे देखील रविंद्र मोरे यांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणात पोलीस धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात यशस्वी ठरतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

sanjay Raut : राऊतांची खासदारकी धोक्यात? प्रकरण उपराष्ट्रपतींच्या कोर्टात

 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT