‘बाबरी प्रकरण तुम्ही भडकवण्याचं…’ ओवेसींनी फडणवीसांवर थेट आरोपच केला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बाबरी पाडल्याचा आनंद साजरा करताना गंभीर वक्तव्यं केली जात आहेत. मात्र घटनात्मक पदावर असतानाही तुम्ही जर अशी वक्तव्यं केली जात असतील तर तुम्ही बाबरी पाडल्याचे न्यायालयात का सांगत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थिते केला आहे.
ADVERTISEMENT
Asaduddin Owaisi: अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाचा जल्लोष देशभर दिसत आहे. तर त्यावरूनच आता राज्यासह देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी, ‘6 डिसेंबर रोजी बाबरी (Babari) पाडली त्यावेळी आपण तिथं हजर होतो आणि तो आपल्या आयुष्यातील आनंदाचा दिवस असल्याचे वक्तव्य केले होते.’ त्यांच्या त्या वक्तव्यावरून एमआयएमचे खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्या त्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप घेत तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, महत्वाच्या घटनात्मक पदावर असताना अशी वक्तव्यं करून तुम्ही हे प्रकरण भडकवण्याचं काम करत नाहीत का असा सवालही त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
घटनात्मक पदाचा दर्जा
एमआयएमचे खासदार व राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, बाबरी पाडली तो दिवस त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस होता. मात्र देवेंद्र फडणवीस एका घटनात्मक पदावर असतानाही आणि राज्यघटनेची शपथ घेतलेली असतानाही तुम्ही हे चांगलं काम कसं काय म्हणू शकता असा सवालही त्यांनी फडणवीसांना केला आहे.
हे ही वाचा >> भाजप नेत्या सना खान प्रकरणात नवा ट्विस्ट, मोबाईल-लॅपटॉप सापडल्याने मोठी खळबळ
निरर्थक भाषा
बाबरी पाडल्याचा तुम्हाला आनंद वाटत असेल, या प्रकरणी तुम्ही निरर्थक भाषा वापरत असाल तर तुम्ही न्यायालयात जाऊन मान्य करायला पाहिजे होता की आम्ही मशीद पाडली, मात्र तुम्ही घाबरून तसं सांगितले नाही आणि त्यामुळेच त्या प्रकरणात कुणाला शिक्षा झाली नाही अशी जोरदार टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.
हे वाचलं का?
बाबरी पाडण्यात अभिमान?
यावेळी असुदद्दीन ओवेसी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही सडकून टीका केली आहे. संजय राऊत यांच्याकडून बाबरी पाडण्यात शिवसैनिक होते असा दावा सातत्याने केला जातो आहे. राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंचा व्हिडीओ शेअर करत बाबरी पाडण्यात शिवसैनिक होते ही अभिमानाची गोष्ट असल्याचे म्हटले होते, त्यावरूनही त्यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
ADVERTISEMENT
VIDEO | “Maharashtra Deputy CM Devendra Fadnavis has said that it was a happy moment for him to be present in Ayodhya on December 6 (1992), when the Babri mosque was demolished. He is on a constitutional post and saying such things. Isn’t he inciting and provoking? Why didn’t he… pic.twitter.com/KNkonWnGRP
— Press Trust of India (@PTI_News) January 3, 2024
ADVERTISEMENT
गुन्ह्यांची कबुली द्या
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांवर टीका करताना त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. बाबरी पाडण्याविषयी तुम्ही जर एवढे मोठे दावे करत असाल तर तुम्ही न्यायालयात जात तुम्ही तुमच्या गुन्ह्यांची कबुली द्या असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. यावेळी त्यांनी तुम्ही घटनात्मक पदावर असताना अशी वक्तव्यं करून तुम्ही भडकावण्याचं काम करत नाही का असा सवालही ओवेसींनी केला आहे.
हे ही वाचा >> Aditya Thackeray : ‘युवराज म्हणजे तळ्या काठी खोटे ध्यान…’ आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT