Devendra Fadnavis: ‘काळं तोंड, नालायक.. मालक’, फडणवीस-खडसेंमध्ये पार जुंपलीच; दोघंही..
News on Maharashtra Politics: जळगावमध्ये आलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार टीका केली. तर दुसरीकडे खडसेंनीही अतिशय तिखट शब्दात फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT

Eknath Khadse: जळगाव: ‘तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली असती का? आता नवीन मालक सांगतो तसं करावं लागतं.’ अशी अत्यंत बोचरी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि आपलेच आधीचे वरिष्ठ सहकारी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर केली. तर याच बोचऱ्या टीकेला उत्तर देत खडसे म्हणाले की, ‘मी बरेच वर्ष देवेंद्र फडणवीसांचा मालक होतो. मी सांगेल तो कागद ते मला आणून द्यायचे.’ अशा तिखट शब्दात खडसेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. (bjp dcm devendra fadnavis jalgaon strongly criticized ncp mlc eknath khadse very harsh words news on maharashtra politics)
जळगावमध्ये आज (27 जून) शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे या कार्यक्रमासाठी जळगावात आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काळे झेंडे दाखविण्यात येणार होते. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याआधीच एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
हे ही वाचा>> PUNE: ‘तो’ देवदूतच… कोयत्याचा वार झेलला, तरुणीला जीवदान देणारा लेशपाल जवळगे आहे तरी कोण?
कापूस प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काळे झेंडे दाखवणार असल्याचे खडसेंनी जाहीर केलं होतं. पण पोलिसांनी त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांना आधीच ताब्यात घेतलं होतं.
‘तोंड काळं केलं नसतं तर आज खडसे…’, फडणवीसांनी डिवचलं
दरम्यान, जळगाव विमानतळावर पोहचलेल्या देवेंद्र फडणवीसांनी खडसेंच्या आंदोलनाबाबत जेव्हा माध्यमांनी विचारलं तेव्हा ते म्हणाले की, ‘माझं तर मत आहे की, कोणाचीही धरपकड करण्याची आवश्यकता नाही. काळे झेंडे दाखवून त्यांना काय मिळणार आहे? खरं तर असं झालंय की, खडसेंना आता नवीन मालक मिळालाय. त्या नवीन मालकाने सांगितलं तसं ते वागतात. आता जमिनीमध्ये जर त्यांनी तोंड काळं केलं नसतं तर काळे झेंडे दाखवायची वेळ थोडी आली असती? ते परिवारात राहिले असते.’










