Maratha Reservation : ”मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर…”, भाजप आमदाराचा सरकारला मोठा इशारा
मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास 2024 मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे हिंगोली भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी जाहीर केले आहे. तान्हाजी मुटकुळे यांनी हे विधान करून पक्षालाच मोठा इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT
Bjp Mla Tanhaji Mutkule Reaction on Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यात मराठा समाजाकडून राजकीय नेत्यांना गाव बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजाचा विरोध पाहता आता राजकीय नेत्यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने विधाने करण्यात सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास 2024 मध्ये निवडणूक लढवणार नसल्याचे हिंगोली भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे (Tanhaji Mutkule) यांनी जाहीर केले आहे. तान्हाजी मुटकुळे यांनी हे विधान करून पक्षालाच मोठा इशारा दिला आहे. (bjp mla tanhaji mutkule big statemnet on maratha reservation shinde fadnavis government maharashtra politics)
ADVERTISEMENT
भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे (Tanhaji Mutkule) यांचा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली आहे. मराठा बांधवांना सांगू इच्छितो की, माझा मराठा कुटुंबात जन्म झाला. मराठा बांधवांविषयी माझ्या मनात कळवळ आहे. मराठा समाजाला आरक्षण नसल्याने त्यांना ज्या अडचणी येतात, त्या मला माहिती असल्याचे तान्हाजी मुटकुळे यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : PM मोदींकडून महाराष्ट्रासाठी मोठी भेट, शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे होणार जमा
दरम्यान मागच्या काळात देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. त्या काळात बऱ्याचशा मराठा समाजातील मुले तहसीलदार, नायब तहसीलदार, डॉक्टर झाले होते. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे, अशी भूमिका तान्हाजी मुटकुळे यांनी मांडली. त्यामुळे येत्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर आगामी विधानसभा निवडणूका लढणार नाही,असा इशाराच तान्हाजी मुटकुळे यांनी सरकारला दिला आहे.
हे वाचलं का?
मराठा समाजावर होणारा अन्याय आपण पदावर राहून सहन करू शकत नाही. त्यामुळे येत्या अधिवेशनात मराठा आमदार एकत्र येऊन सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडणार आहोत. मराठा समाजाने आमच्यावर अविश्वास दाखवू नये, असे आवाहन देखील तान्हाजी मुटकुळे यांनी मराठा समाजाला केले आहे.
हे ही वाचा : Murder Case : काकाने पुतण्याचा गळा चिरला, अन् गरोदर सुनेच्या पोटातच…
शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची गुणरत्न सदावर्ते यांच्यावर टीका करताना जीभ घसरली आहे.आमदार संजय गायकवाड यांनी गुणरत्न यांच्यावर टीका करताना म्हटले की, त्यांची गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे, याला संपवायला पाहिजे होता असं धक्कादायक विधान आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. गायकवाडांच्या या विधानाने वाद पेटण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT