Lok Sabha 2024 : शाहांनी दिला स्पष्ट ‘मेसेज’! ४८ जागांसाठी १२ क्लस्टर, स्ट्रॅटजी काय?
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी १२ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एका क्लस्टरप्रमुखावर चार मतदारसंघांची जबाबदारी आहे.
ADVERTISEMENT

BJP Cluster Strategy for Lok Sabha 2024 Election : भाजपने पूर्णपणे लोकसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले असून, देशातील ५४३ जागांसाठी क्लस्टर स्ट्रॅटजी तयार केली आहे. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी १२ क्लस्टर तयार करण्यात आले असून, प्रत्येक क्लस्टर प्रमुखावर चार लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासंदर्भात १६ जानेवारी रोजी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत अमित शाह यांनी उपस्थितांना लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी स्पष्ट मेसेज दिला.
देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांसाठी भाजपने १५६ क्लस्टरप्रमुख नियुक्त केलेले असून, त्यांच्याकडून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यात आला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महासचिव बी.एल. संतोष हे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील हे नेते होते उपस्थित
भाजपच्या या बैठकीला महाराष्ट्र भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, राम सातपुते, अतुल सावे, हर्षवर्धन पाटील, रवींद्र चव्हाण हे नेते उपस्थित होते.
हेही वाचा >> ‘मी फक्त पुरावे दाखवले नाही तर…’ नार्वेकरांनीही कायद्याच्याच भाषेत दिलं उत्तर
१२ क्लस्टरप्रमुखांना ३ ते ४ जागा जिंकण्याचे टार्गेट
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी १२ क्लस्टर तयार करण्यात आले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एका क्लस्टरप्रमुखावर चार मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यांना ३ ते ४ जागा जिंकून आणण्याचं टार्गेट दिलं गेलं आहे.