Lok Sabha Election 2024 : विरोधकांची सत्तेत घरवापसी होऊ शकते का?
लोकसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना विरोधकांनी पुन्हा एकदा एकजूट दाखवली आहे. फरक असा की, यावेळी दिल्लीपासून हजार किलोमीटर दूर असलेल्या पाटण्यात विरोधी एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले.
ADVERTISEMENT

आजपासून एक वर्ष पुढे गेले तर देशात 18वी लोकसभा स्थापन झालेली असेल, पण 18व्या लोकसभेचा नेता अर्थात पंतप्रधान कोण असेल? प्रत्येकाचे स्वतःचे वेगवेगळे दावे आहेत. नरेंद्र मोदींना पराभूत करणे अशक्य असल्याचा भाजपचा दावा आहे, तर सगळे एकत्र आल्यास पराभव होऊ शकतो, असा विरोधकांचा दावा आहे.
त्यामुळेच लोकसभा निवडणुकीला वर्षभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक असताना विरोधकांनी पुन्हा एकदा एकजूट दाखवली आहे. फरक असा की, यावेळी दिल्लीपासून हजार किलोमीटर दूर असलेल्या पाटण्यात विरोधी एकजुटीचे चित्र पाहायला मिळाले.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निमंत्रणावरून डझनहून अधिक विरोधी पक्षांचे नेते शुक्रवारी दाखल झाले. या बैठकीचा एकच अजेंडा होता की 2024 मध्ये भाजपला सत्तेतून कसे हटवायचे?
हेही वाचा >> Lok Sabha 2024 : नितीश कुमार पहिली परीक्षा पास, 1998 सारखा चमत्कार होणार?
या सभेला हजेरी लावण्यासाठी आलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले, ‘सर्व विरोधी पक्ष इथे आले आहेत आणि एकत्रितपणे आम्ही भाजपचा पराभव करू.’ ते म्हणाले की, ‘तुम्हाला माहिती आहे, द्वेषाचा प्रतिकार द्वेषाने करता येत नाही. प्रेमानेच त्याचा पराभव केला जाऊ शकतो. काँग्रेस संपूर्ण देशाला एकत्र आणण्यासाठी आणि प्रेम पसरवण्याचे काम करत आहे.’










