Chhagan Bhujbal : ''जरांगेंनी माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी'', भुजबळांचे थेट ओपन चॅलेंज
Chhagan Bhujbal News : मला पाडण्यापेक्षा जरांगेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवय आहे. येवला मतदारसंघात कोणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरांगे पाटलांनी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
जरांगेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी.
मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवय
मी लाखभर मतांनी निवडून येणार
Chhagan Bhujbal Challenge Manoj jarange : ''आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे 113 आमदार पाडू,'' असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला होता. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी ''मनोज जरांगे (Manoj jarange) यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी सर्व 288 जागांवर निवडणूक लढवावी आणि येवल्यात स्वत: जरांगेंनी आपल्यासमोर निवडणूक लढावी' असे आव्हान जरांगे पाटलांना दिले आहे. भुजबळांचे( Chhagan Bhujbal) हे आव्हान जरांगेंनी स्विकारले आहे. (chhagan bhujbal challenge manoj jarange patil maratha reservation maharashtra assembly election maharashtra politics)
छगन भुजबळ टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी भुजबळ म्हणाले, ''रोज रोज भूमिका बदलत बसण्यापेक्षा मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे करून दाखवावेत. प्रत्येक वेळी भूमिका बदलण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात. आता म्हणतात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. पण मुस्लिमांना 25 वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिले आहे. पण जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढे येत आहेत. त्यांनी एकच काहीतरी करावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे.
हे ही वाचा : Crime : रात्री हातावर मेहंदी काढली, सकाळी आईचा मृतदेह पाहून मुलीने...संभाजीनगर हादरलं!
छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे विधान मनोज जरांगे यांनी केले होते. यावर छगन भुजबळ म्हणाले, मला पाडण्यापेक्षा जरांगेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवय आहे. येवला मतदारसंघात कोणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरांगे पाटलांनी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
मनोज जरांगे पाटील आता 29 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आता हे शेवटचे उपोषण असणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषणाला बसण्याआधी राज्य सरकारने मराठा अरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
जरांगे काय म्हणाले?
मला राजकारणाची अथवा निवडणुकीची लालसा नाही. मला फक्त माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्याच्या लेकरांना आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठीच माझा लढा असल्याचे जरांगे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजात फुट पाडण्याची खेळी खेळत आहेत. मात्र मराठा समाज त्यांची ही खेळी ओळखून आहे. आमदार राऊत यांनी ही आपली पोपटपंची जास्त करू नये, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Ladki Bahin yojana: अर्ज मंजूर झालाय, पण Village, Ward लेव्हल पेंडिंग; 3000 मिळणार की नाही?
मनोज जरांगे पाटील म्हणाले, राउतांचा समाचार घेण्यासाठी व त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण लवकरच बार्शीत सभा घेणार आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने सावध भूमिका घेत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या मागेपुढे करू नका. आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार करा. जो आपल्याला आरक्षण देईल, तोच आपला. हे लक्षात ठेवा असे जरांगे म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT