‘अजित पवारांना राजकीय आजारपण’, भुजबळांनी सांगितला नेमका कसला त्रास?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Cabinet Minister Chhagan Bhujbal informed about Deputy Chief Minister Ajit Pawar's illness.
Cabinet Minister Chhagan Bhujbal informed about Deputy Chief Minister Ajit Pawar's illness.
social share
google news

Ajit Pawar NCP : मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते. त्यामुळे अचानक अजित पवारांना झालं काय, हा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघे दिल्लीला गेल्यानं तर्कविर्तकांना उधाणच आलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वीही अजित पवार एक दोन वेळा असेच आजारी पडले होते. त्यामुळे अजित पवारांना पुन्हा राजकीय आजारपण आलंय की काय अशी चर्चा रंगली. हाच प्रश्न जेव्हा छगन भुजबळांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सविस्तर उत्तर दिलं. इतकंच नाही, तर अजित पवारांना नेमका काय त्रास होतोय, तेही सांगितलं. (why Ajit Pawar absent to cabinet meeting)

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजित पवार गटाच्या भूमिकेनं भाजपचं वाढणार टेन्शन! शिंदे सरकार काय करणार?

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला अजित पवार अनुपस्थित होते. त्यानंतर पक्षाच्या बैठकीलाही ते नव्हते. त्यानंतर ते आजारी असल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान, अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांनी माध्यमांशी संवाद साधताना यावर सविस्तर भाष्य केलं.

अजित पवारांना काय झालंय… छगन भुजबळांनी सांगितला आजार

अजित पवारांच्या आजारपणाबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “अजित पवारांना थ्रोट इन्फेक्शन (घशात संसर्ग) झालं असल्यामुळे ते दिल्लीला जाऊ शकत नाही. कॅबिनेट बैठकीबद्दल त्यांनी निरोप दिला की, आज ते (अजित पवार) येणार नाही. तुम्ही बैठक घ्या. जर अजित पवार थ्रोट इन्फेक्शनमुळे देवगिरीतून मंत्रालयात जाऊ शकत नाही, तर दिल्लीला कसे जाणार?”, असं भुजबळांनी सांगितलं.

हे वाचलं का?

हेही वाचा >> समजून घ्या: दसरा मेळावा अन् शिवसेना… शिवाजी पार्कवरुन काय झालेला राडा?

यावेळी छगन भुजबळांना अजित पवारांना राजकीय आजारपण आलं आहे का?, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर भुजबळ म्हणाले, “अजित पवारांना राजकीय आजारपण कधीच येणार नाही. काळजी करू नका. मनुष्य आजारी पडू शकत नाही का? दगदग, धावपळ, जागरणामुळे माणूस आजारी पडू शकतो”, असं सांगत त्यांनी या विषयावर पडदा टाकला.

अजित पवार आजारी, वेगवेगळ्या चर्चांना फुटलं तोंड

अजित पवार आजारी असले, तरी त्यांच्या आजारपणाचा संबंध सध्याच्या राजकीय घडामोडींशी लावला जात आहे. अजित पवारांच्या वाढत्या वर्चस्वामुळे एकीकडे शिंदेंचे नेते नाराज असल्याचे सांगितलं जात आहे. तर दुसरीकडे अजित पवारच सरकारमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार अर्थमंत्री असले, तरी त्यांच्याकडून कामाच्या फाईल देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंकडे जातात, त्याबद्दल नाराजी असल्याचे म्हटले जात आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT