Shiv sena : अंधारेंचा थेट शिंदेंवर वार, ‘मुख्यमंत्र्यांनी खुर्ची सोडावी तरच…’
मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना आपली खुर्ची सोडावी तरच आम्ही त्यांना ते खरच मराठ्यांच्या बाजूचे आहेत असं समजू असा टोला सुषमा अंधारे यांनी मुक्त संवाद यात्रेतून लगावला आहे.
ADVERTISEMENT
Sushma Andhare : लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election) काही दिवसांवर आल्या असतानाच ठाकरे गटाच्या शिवसेनेने (Shiv sena ) कंबर कसली आहे. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोकण पिंजून काढला आहे तर दुसरीकडे सुषमा अंधारे यांनी विदर्भ मराठवाड्यातून मुक्त संवाद यात्रेतून (Mukt Sawand Yatra) सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मुक्त संवाद यात्रा विदर्भातून मराठवाड्यात दाखल झालेली आहे. या यात्रेचा आज मराठवाड्यातील तिसरा दिवस होता. यावेळी त्यांनी हिंगोलीच्या गांधी चौकातील सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
ADVERTISEMENT
तरच मराठ्यांच्या बाजूचे
यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मुख्यमंत्री यांनी खुर्ची सोडली पाहिजेत आणि रस्त्यावर येऊन आंदोलन केले पाहिजे, तेव्हाच आम्ही म्हणू एकनाथ शिंदे खरच मराठ्यांच्या बाजूचे आहेत असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. मराठा आरक्षणावरून अंधारेंनी अनेक संदर्भ देत एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी राजीनामा देऊन आपणही त्यांच्यासोबत असल्याचे सांगावे असं म्हणत त्यांनी थेट राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
हे ही वाचा >> Ajit Pawar : शरद पवारांवरील ‘त्या’ वक्तव्यावर अजित पवारांचा खुलासा, ‘ज्येष्ठ नेत्यांनी…’
खुर्ची सोडली पाहिजे
ओबीसी आरक्षणासाठी 1952 साली ज्याप्रमाणे तत्कालीन कायदेज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला त्याप्रमाणे मराठ्यांच्या आरक्षणासाठी एकनाथ शिंदे यांनीही खुर्ची सोडली पाहिजे असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न सुषमा अंधारेंनी केल्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे वाचलं का?
शिंदे भुर्र होतील
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करावे. तसेच मुंबईला त्या दिवशी जे घडलं ती आधीसूचना होती त्यावर हरकतीही मागवण्यात आल्या आहेत त्यानंतर आचारसंहिता आणि त्यानंतर इलेक्शन त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भुर्र होतील अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
हे ही वाचा >> सरन्यायाधीशांच्या संतापाचा कडेलोट, भाजपला मोठा झटका, सुप्रीम कोर्टाने काय दिले आदेश
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT