Mohan Yadav: Rss चे निकटवर्तीय, 7 वेळा आमदार, मुख्यमंत्री पदाआधीही त्यांनी भूषविले आहेत ही पदं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Closer to RSS 7-time MLA Mohan Yadav has had an interesting journey to the post of Chief Minister
Closer to RSS 7-time MLA Mohan Yadav has had an interesting journey to the post of Chief Minister
social share
google news

CM Mohan Yadav : मोहन यादव आता मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मोहन यादव यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. शिवराज सरकारमध्ये (Shivraj Government) अर्थमंत्री असलेले जगदीश देवरा (Jagadish Devra) आणि विंध्यचे प्रमुख ब्राह्मण नेते म्हणून ज्यांची ओळख आहे ते राजेंद्र शुक्ला (Rajendra Shukla) आता उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर माजी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर हे मध्य प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष असणार आहेत.

ADVERTISEMENT

विद्यार्थी ते मुख्यमंत्री

मोहन यादव हे उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार आहेत. याआधी मोहन यादव हे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री होते. या मतदारसंघातून ते सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत. विद्यार्थीदशेपासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली आहे. मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या राजकीय प्रवासाबद्दल सांगत आहोत.

हे ही वाचा >> प्रियकराच्या आईला खांबाला बांधलं अन् विवस्त्र करून…गर्लफ्रेंडच्या कुटुंबीयांचं सैतानी कृत्य

मोहन यादव यांचा राजकीय प्रवास

मोहन यादव यांच्या राजकारणाला विद्यार्थीदशेपासूनच राजकीय इनिंगला सुरुवात झाली. मोहन यादव यांची 1979 साली रामपुरा येथील शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली होती. ते उज्जैन येथील विक्रम विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्यही होते. मोहन यादव यांनी बीजेवायएममध्येही अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत. ते बीजेवायएममध्ये अनुसूचित जातीचे प्रदेशाध्यक्षही होते. मोहन यादव 1990 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2003 मध्ये ते पुन्हा आमदार झाल्यावर त्यांना राज्यमंत्री करण्यात आले. तर 2008 मध्ये आमदार झाल्यावर त्यांना परिवहन मंत्री पद देण्यात आले. ते मोहन यादव आतापर्यंत 7 वेळा आमदार झाले आहेत.

हे वाचलं का?

सलग तीन वेळा आमदार

2023 च्या निवडणुकीत मोहन यादव यांनी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा पराभव केला होता. उज्जैन दक्षिण मतदारसंघातून ते 12941 मतांनी विजयी झाले आहेत. मोहन यादव यांनी उज्जैन दक्षिण मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. मोहन यादव यांनी दीर्घकाळ संघात काम केले आहे. त्या काळात त्यांनी अनेक पदंही भूषवली आहेत. मोहन यादव हे विद्यार्थी परिषदेशीही जोडले गेले होते, तेव्हापासूनच त्यांचे सक्रिय राजकारण सुरु झाले होते.

मोहन यादव यांची मालमत्ता किती ?

मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री 58 वर्षीय मोहन यादव यांची एकूण संपत्ती 42 कोटींची आहे. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर 9 कोटी रुपयांचे कर्जही आहे. तसेच राज्यातील जे मातब्बर नेते आहेत, त्या नेत्यांमध्ये त्यांची गणना होते.

ADVERTISEMENT

मोहन यादव यांचं कुटुंब

मोहन यादव यांचा जन्म 1 जुलै 1957 रोजी नीमच जिल्ह्यातील रामपुरा येथे झाला. वडिलांचे नाव गेंदालाल देवरा. मोहन यादव यांच्या पत्नीचे नाव रेणू देवरा आहे. त्यांना दोन मुलगे आहेत. मोहन यादव यांनी बीएस्सी, एलएलबी आणि पीएचडी पदवी प्राप्त केली आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>MP Chief Minister: मोहन यादवांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची कशी मिळवली? वाचा Inside Story

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT