Vidhan Sabha : CM शिंदेंनी ठाकरेंना काढला चिमटा, 'शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम...'
CM Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरेंना चिमटा काढला आहे. ''शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल काय? असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला आहे.
ADVERTISEMENT
CM Eknath Shinde Criticize Uddhav Thackeray : 'शेतकऱ्यांना घरी बसून शेतातील काही कामे करता येतील का, त्याला वर्क फ्रॉम होम करता येतील का? याचा विचार संशोधकांनी करावा', असे आवाहन ठाकरे गटाते प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. ठाकरेंच्या याच विधानावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाकरेंना चिमटा काढला आहे. ''शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल काय? असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला आहे. (cm eknath shinde criticized udhhav thakceray aditya thackeray farmer vidhan sabha maharashtra politics)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत उत्तर देत होते, यावेळी त्यांनी ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला होता. कुणी तरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते. शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल काय, असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून (ठाकरे) काय अपेक्षा करणार. त्यांना काय प्रश्न उमजणार आणि समजणार? हा एक प्रश्न निर्माण झाला आहे, असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना लगावला.
हे ही वाचा : Live : CM शिंदेंचे विरोधकांना उत्तर, शेवटच्या दिवशी काय बोलले?
कंगना रणौतचे घर तोडायला महापालिकेचे 85 लाख खर्च केले. हा काय अंहकार आहेत. आणि देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरन केलं. पण या उद्दातीकरण करणाऱ्यांना जीवा महालाच स्मारक आठवलं नाही. ते आम्ही करतोय, असी टीका देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर केली.
हे वाचलं का?
शाळेच्या आजुबाजुला जिथे कुठे टपऱ्या दिसतील, हॉटेल दिसतील, तिथे कुठे ड्रग्ज विकत असतील तर डायरेक्ट बांधकाम तोडून टाका, जवळपास बाराशे बांधकाम आम्ही तोडून टाकली. यामध्ये थयथयाट नाईट लाईफ वाल्यांचा होतोय. आपलं नाही आहे नाईटलाईफ, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना नाव न घेता लगावला आहे.
हे ही वाचा : पवारांचं निमंत्रण शिंदे-फडणवीसांनी नाकारलं, पण अजितदादा
ठाकरे काय म्हणाले होते?
'शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला पाहिजे. शेतकऱ्यांना घरी बसून शेतातील काही कामे करता येतील का, त्याला वर्क फ्रॉम होम करता येतील का? याचा विचार संशोधकांनी करावा', असे आवाहन ठाकरे गटाते प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. शेतीला पाणी देणे, सुक्ष्म सिंचनाचा उपयोग करताना शेतकऱ्यांना घरी बसून पिकांना पाणी देण्याची व्यवस्था विकसित करता येईल का, असे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समीती 2020 ची 48 वी सभा अकोला येथे ऑनलाईन पद्धतीने पार पडली होती. या सभेत ठाकरेंनी हे विधान केले होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT