Ramdas Kadam : 'भाजपला एकट्याला जिवंत राहायचं का?', जागावाटपावरून शिंदेंचा नेता संतापला

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

हे. ''भाजपला सर्व पक्षांना संपवून एकट्याला जिवंत राहायचंय'' अशी टीका शिंदेंच्या आमदाराने केली आहे. तसेच रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही,अशी भुमिका या आमदाराने घेतली आहे.
cm eknath shinde mla ramdas kadam criticized bjp devendra fadnavis ratnagiri sindhudurg lok sabha seat narayan rane uday samant kiran samant maharashtra politics
social share
google news

Ramdas kadam criticized BJP : आगामी लोकसभा निवणडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी पक्षांनी उमेदवारांची चाचपणी आणि जागावाटप ठरवायला सुरूवात केली आहे. असे असतानाच भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गुरुवारी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार( ratnagiri sindhudurg lok sabha seat) संघावर दावा सांगितला होता.या दाव्यानंतर शिंदेंचा आमदार (Ramdas kadam) चांगलाच भडकला आहे. ''भाजपला सर्व पक्षांना संपवून एकट्याला जिवंत राहायचंय'' अशी टीका शिंदेंच्या आमदाराने केली आहे. तसेच रत्नागिरीची जागा शिवसेना सोडणार नाही,अशी भुमिका या आमदाराने घेतली आहे.   त्यामुळे आता कोकणातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे.  (cm eknath shinde mla ramdas kadam criticized bjp devendra fadnavis ratnagiri sindhudurg lok sabha seat narayan rane uday samant kiran samant  maharashtra politics)  

''रायगड लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा वर तुम्ही सांगाल आम्हीच तर असं होत नाही. रत्नागिरीची जी जागा आहे ती शिवसेनेची आहे. तुम्हाला भाजपला सर्व पक्षाला संपवून एकट्याला जिवंत राहायचं का?'' असा सवाल उपस्थित करून शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली आहे. ''आम्ही दोघे भाऊ भाऊ, तुझा आहे ते वाटून खाऊ, आणि माझ्याला हात नका लावू, असं होता कामा नये'', असा टोला देखील रामदास कदमांनी भाजपला लगावला आहे. 

हे ही वाचा : बामणी कावा.. पवारच माझ्या जातीवर जातात: फडणवीस

दरम्यान ''कुठल्याही परिस्थितीत आम्ही रत्नागिरीची जागा सोडणार नाही. आम्ही ती लढवणार आहोत. ती जागा आमची आहे. आमच्या हक्काची आहे. मागच्या वेळेला आता जे खासदार आहेत, त्यांची शेवटची सभा मी घेतली होती सावंतवाडीमध्ये...ती आमच्या हक्काची जागा आहे.आम्ही ती का सोडू'', असा सवाल देखील रामदास कदम यांनी भाजपला केला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान गुरूवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला होता. 

हे ही वाचा : Manoj Jarange : रुग्णालयातून बाहेर पडताच जरांगेंचा फडणवीसांवर हल्ला

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गची ही जागा शिवसेना-भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाट्याला येते.त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते आणि तसे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी अनेकदा बोलूनही दाखवले आहे. उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे जागावाटपात ही  जागा शिवसेनेकडून ठेवून किरण सामंतांना मिळवण्यासाठी उदय सामतांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता नारायण राणेंनी ट्विट करून या जागेवर भाजपचा दावा केला आहे. त्यामुळे आता कोकणातील राजकारण पेटण्याची शक्यता आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT