मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शेवटच्या दिवशी फटकेबाजी; उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

cm eknath shinde hits out at former chief minister uddhav Thackeray in maharashtra assembly speech.
cm eknath shinde hits out at former chief minister uddhav Thackeray in maharashtra assembly speech.
social share
google news

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिलं. विधानसभेत बोलताना शिंदेंनी जोरदार फटकेबाजी केली. शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख टाळत टोमण्यांवरून समाचार घेतला. एकनाथ शिंदेंनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावरूनही टोला लगावला.

एकनाथ शिंदेंनी विरोधकांना दिलं उत्तर

– अनेक सदस्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. विरोधी पक्षनेत्याचं भाषण मी ऐकत होतो. जो पेन ड्राईव्ह आपण दिला, त्याची मी माहिती घेतली. त्याचं गांभीर्य ओळखून सरकार याची चौकशी करेल.
– अंतिम आठवडा प्रस्तावात राज्यातील विषयांना न्याय देण्यासाठी लक्ष्य केंद्रीत करतो. त्यात खूप विषय आलेले आहेत. त्याला मी उत्तर देणार आहे.

वाचा >> Supreme Court: राहुल गांधींच्या बाजूने निकाल, संजय राऊतांचं थेट मोदी-शाहांना चॅलेंज!

“सध्या बघितलं तर गोंधळ आहे. गोंधळलेली परिस्थिती आहे. थोडासा आत्मविश्वास कमी वाटतोय. शेवटी संख्येचा परिणाम होतो. जयंतराव, तुम्ही नागपूर निलंबित झाला होतात. तेव्हा मी अजित पवारांना म्हणालो होतो की, सभागृहात जयंतराव पाहिजेत.”

– विजयभाऊ, तुम्ही हिवाळी अधिवेशनात जोरदार बॅटिंग करू शकता. तुम्हाला भरपूर वेळ आहे.
– उद्योग बाहेर गेल्याचा विषय आपण आणला नाही. वेदांता, फॉक्सकॉनवरून काहूर उठवलं. उद्योगमंत्र्यांनी जाहीर केलेल्या श्वेतपत्रिकेमुळे तुमचं समाधान झालेलं असेल.
– महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात 1 लाख 18 कोटींची विदेशी गुंतवणूक झाली. कारण गेल्या दोन वर्षात कर्नाटक आणि गुजरात आपल्या पुढे होतं. पण, वर्षभरात महाराष्ट पुन्हा नंबर एकवर गेला आहे.
– 70 ते 80 हजार कोटींची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिझल्ट मिळत नाही. तुम्ही आकडे तपासू शकता.
– पूर्वीच्या दावोसच्या दौऱ्यामध्ये (मविआ सरकारच्या काळातील) काय झालं, हे मला माहिती नाही. किती करार झाले, किती करारांची अंमलबजावणी केली. मला त्याची माहिती नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

वाचा >> Nitin Desai आत्महत्या आणि रशेष शाह कनेक्शन; आशिष शेलारांचे 4 स्फोटक सवाल

“खोटं बोलून वस्तुस्थिती लपत नसते. महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षात जी कामं बंद केली होती. प्रकल्प थांबवले होते. जनतेचे, राज्याचं नुकसान केले. आमचं सरकार आल्यानंतर स्थगिती उठवल्या. हे सरकार 24 तास सातही दिवस काम करणार आहे. फक्त फेसबुक लाईव्ह आणि घरी बसून काम करणार नाही. ही वस्तुस्थिती आहे.

गेले वर्षभर सरकार पडणार. मुख्यमंत्री बदलणार. सगळे नवे ज्योतिष शोधत होते. पृथ्वीबाबा कुठे गेले? ते माझ्या मागे का लागले? त्यांचे माझे चांगले संबंध पण तेही म्हणायला लागले की, नवीन मुख्यमंत्री होणार. मी काही त्यांना विचारलं नाही, कारण ते एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की, दोन-चार वेळा बोलतात. मग त्यांना कळलं की हे काही नाही, तर ते सोडून देतात.

मुंबई Tak चावडी: मुंडेंना राष्ट्रवादीत घेण्यास पवारांचा विरोध होता,पण… जिंतेंद्र आव्हाडांनी सांगितली Inside Story

– सुधीरभाऊ विजयभाऊंची मजबुरी आहे. विरोधी पक्षनेते आहेत. विजयराव आकडे कधी लपत नसतात.
– मगाशी कुणीतरी म्हणालं की, शासन आपल्या दारी वर भास्कर जाधव बोलले. त्यांच्या जिल्ह्यामध्ये 1 लाख 62 हजार 845 लाभार्थी आहेत. आतापर्यंतचे 1 कोटी 13 लाख लाभार्थी आहेत. हा माझा आकडा नाहीये. तहसिलदारांचं पत्र आहे.
– मासा मेला तेव्हा ते बाहेर रडत होते आणि नंतर अजितदादांबरोबर आले. त्यानंतर ते माझ्याकडे बरंच काही बोलले. कसं आहे बरंच काही पोटात ठेवावं लागतं. बोलायला लागलो, तर ते थांबणार नाही इथे. ते असताना मी बोलेन.
– पूर्वी पण योजना होत्या, पण इतके खेटे मारावे लागायच्या की माणूस ते सोडून द्यायचा. अनिल देशमुखजी, तेव्हा शासन आपल्या दारी नव्हतं, शासन आपल्या घरी होतं.

सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या! भाजपला घेरलं; म्हणाल्या, ‘नॅचरली करप्ट पार्टी म्हणता, मग…’

शिक्षणाचा दर्जा घसरल्याचा उल्लेख देखील काही लोकांनी केला. हा अहवाल 2020-21 आणि 2021-22 चा आहे. तेव्हा सांगा कोण मुख्यमंत्री होतं? टीका करत नाही, पण यामध्ये त्या दोन वर्षांमध्ये बऱ्याच गोष्टींचा दर्जा घसरला. शिक्षणाचा घसरला. विचारांचा घसरला. आर्थिक गुंतवणुकीचा दर्जा घसरला. सगळ्यांचा दर्जा घसरला आणि टोमण्यांचा जमाना आला. आम्ही घसरलेला दर्जा सुधारण्याचं काम करतोय.

शरद पवारांनी एकदा मला फोन केला होता. त्यांनी मला सांगितलं. त्यांनाही मी सांगितलं की, हे या या वर्षी झालेलं आहे, पण आम्ही त्यात सुधारणा करतोय. आम्ही दोष देत बसणार नाही, पण ठोस काम करणार.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT