इंदिरा गांधींचा बछड्यासोबतचा फोटो, काँग्रेसने नरेंद्र मोदींना व्याघ्र सफारीवरून घेरलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Project tiger : टायगर प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी कर्नाटकातील बांदीपूर आणि मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली. यादरम्यान बांदीपूर व्याघ्र प्रकल्पातील सफारीचा आनंद घेतला आणि कॅमेऱ्यातील अनेक छायाचित्रेही क्लिक केली. याशिवाय पीएम मोदी स्वतःच्या हाताने काही हत्तींना ऊस खाऊ घालताना दिसले. काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या या भेटीवर प्रश्न उपस्थित करत त्याचे श्रेय माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना दिले. (Congress targets PM Modi by sharing photo of Indira Gandhi with tiger calf)

PM Modi : टायगर प्रिंटेड शर्ट, काळी टोपी अन्; पंतप्रधान मोदींचा जंगल सफारीनिमित्त खास लुक

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट करत पंतप्रधानांच्या दौऱ्यावर हल्लाबोल केला. त्यांनी लिहिले, ‘बांदीपूरमध्ये 50 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या टायगर प्रोजेक्टचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान घेतील. पर्यावरण, जंगल, वन्यजीव आणि वनक्षेत्रात राहणारे आदिवासी यांच्या रक्षणासाठी केलेले सर्व कायदे उद्ध्वस्त होत असताना ते खूप तमाशा करतील. ते कदाचित ठळक बातम्या मिळवू शकतील पण वास्तव याच्या अगदी उलट आहे, असं ते म्हणाले.

काँग्रेसने इंदिरा गांधींचा फोटो शेअर केला

याशिवाय कर्नाटक काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही ट्विट करून पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल करण्यात आला. ट्विटमध्ये लिहिले होते, ‘काँग्रेसने 70 वर्षांत काय केले? काँग्रेस सरकारनेच 1973 मध्ये बांदीपूर व्याघ्र संवर्धन प्रकल्प राबवला, जिथे आज तुम्ही सफारीचा आनंद घेत आहात. त्याचाच परिणाम आहे की आज वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याशिवाय काँग्रेसने टोमणे मारत लिहिले की, पीएम मोदींना विशेष आवाहन आहे की बांदीपूर अदानींना विकू नका.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तीन दिवसीय मेगा इव्हेंट सुरू होत आहे

आपल्या दौऱ्यात पंतप्रधान नुकत्याच झालेल्या व्याघ्रगणनेचा अहवाल, व्याघ्र संवर्धनासाठी सरकारच्या दृष्टीकोनाचे प्रकाशन करतील आणि या कार्यक्रमाच्या स्मरणार्थ एक नाणेही जारी करतील. या निमित्ताने म्हैसूर आणि चामराजनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय मेगा इव्हेंटचे उद्घाटनही पंतप्रधान करणार आहेत.

यामुळे हा दौरा आणखीनच खास बनला आहे

विशेष म्हणजे, आज पंतप्रधान मोदींनी मुदामलाई व्याघ्र प्रकल्पातील थेप्पाकडू हत्ती कॅम्पलाही भेट दिली. हा तोच एलिफंट कॅम्प आहे जिथे ऑस्कर विजेत्या ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ चित्रपटातील रघू देखील राहतो. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ हा भारतातील पहिला डॉक्युमेंटरी आहे, ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाने परदेशी रंगमंचावर एवढी प्रसिद्धी मिळवली, जी आजपर्यंत कुणालाच मिळाली नव्हती. या चित्रपटात एका जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे, जे एका हत्तीला स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवतात.

ADVERTISEMENT

PM Modi: ;एकटा किती जणांवर भारी पडतोय;, मोदींनी थेट छाती ठोकून ठणकावलं!

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT