'या' 12 जागांमुळे आपचा गेम झाला, काँग्रेसमुळे पराभव अन् भाजपला...

मुंबई तक

दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सोबत न घेतल्याने 'आप'ला राज्यातील सत्ता गमवावी लागली आहे. एकूण 12 जागा अशा आहेत की, जिथे आपच्या उमेदवारांचा जितक्या मतांनी पराभव झाला त्यापेक्षा अधिक मतं ही काँग्रेसच्या उमेदवारांना मिळाली आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: दिल्ली निवडणुकीचे निकाल भाजपच्या बाजूने लागले आहेत. आम आदमी पक्षाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. तर  काँग्रेसला आपले खातेही उघडता आले नाही. पण काँग्रेसमुळेच 'आप'ला तब्बल 12 जागांवर पराभव पत्करावा लागला. जर दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असती तर दिल्ली विधानसभेची परिस्थिती ही वेगळी असती. काँग्रेसमुळे 'आप'ला कोणत्या 12 जागांवर पराभव पत्करावा लागला ते आपण आता पाहूया.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला प्रचंड बहुमत मिळाले. त्याच वेळी, गेल्या 12 वर्षांपासून दिल्लीत सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. तर काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. काँग्रेसचा पराभव निश्चितच झाला, पण 70 जागांपैकी 12 जागांवर काँग्रेसमुळे 'आप'ला पराभव पत्करावा लागला.

 

हे ही वाचा>> Big Breaking: अरविंद केजरीवालांचा दारूण पराभव, विजय मिळवणारा 'तो' जायंट किलर कोण?

दिल्ली निवडणुकीच्या निकालांवर जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला आणि 'आपसात अधिक लढा...' असा टोमणा मारला आहे. या विधानाचा अर्थ असा आहे की, काँग्रेसमुळे 'आप'चा पराभव झाला.

जर आप आणि काँग्रेसमध्ये युती झाली असती तर दिल्लीत दोन्ही पक्षांच्या युतीच्या जागा 37 झाल्या असत्या, म्हणजेच बहुमतापेक्षा एक जागा जास्त. खरं तर, 12 जागा अशा होत्या जिथे 'आप'च्या पराभवाचे अंतर काँग्रेसला मिळालेल्या मतांपेक्षा कमी होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp