Delhi Ordinance Bill: ‘आपके आँखो की शरम तक आपने बेची है..’, संजय राऊत राज्यसभेत का भडकले?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

delhi ordinance bses bill shiv sena ubt mp sanjay raut criticized bjp in rajyasabha political news headlines india
delhi ordinance bses bill shiv sena ubt mp sanjay raut criticized bjp in rajyasabha political news headlines india
social share
google news

Delhi Bill: नवी दिल्ली: केंद्रशासित प्रदेश असलेल्या दिल्लीवरुन (Delhi) सध्या राज्यसभेत (Rajyasabha) घमासान सुरू आहे. दिल्लीतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांबाबत सुप्रीम कोर्टाने अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय केजरीवाल सरकारच्या (Kejriwal Government) बाजूने दिला होता. ज्यानंतर मोदी सरकारने याचबाबत एक अध्यादेश जारी केला. याच अध्यादेशाचं (Government of National Capital Territory of Delhi Amendment Bill, 2023) आता कायद्यात रुपांतर करण्यासाठी तो राज्यसभेत मांडण्यात आला आहे. ज्यावर आज (7 जुलै) जोरदार चर्चा सुरू आहे. याच चर्चेदरम्यान, शिवसेना (UBT) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सभागृहात मोदी सरकारवर तुफान टीका केली. (delhi ordinance bses bill shiv sena ubt mp sanjay raut criticized bjp in rajyasabha political news headlines india)

‘माझे तिकडचे (भाजप) अनेक मित्र आहेत… मला वाटलं की, त्यांना जुने दिवस आठवतील. जे लोकशाहीबाबत मोठ्या-मोठ्या बाता मारायचे… पण मला तुमच्या डोळ्यात मला काहीही लज्जा दिसून आली नाही.’ असं म्हणत संजय राऊत यांनी या विधेयकावरुन भाजपला बरंच टार्गेट केलं आहे. यावेळी अतिशय आक्रमकपणे संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला.

4 मिनिटात संजय राऊतांची राज्यसभेत चौफर फटकेबाजी…

‘मी या विधेयकाच्या कायदेशीर बाबींवर नाही बोलणार.. चिदम्बरम, डॉ. सिंघवी.. देशाचे माजी सरन्यायाधीश सर्वांनीच याबाबत बोलले आहेत. पण मी एवढंच म्हणेन की, आपण एक अतिशय खतरनाक विधेयक घेऊन आले आहात. या विधेयकाला विरोध करण्यासाठी मी इथे उभा आहे. जे या विधेयकाच्या समर्थनार्थ मतदान करतील ते भारत मातेसोबत बेईमानी करतील. इंडियासोबत बेईमानी करतील.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘देशाची जी संघराज्याची रचना आहे.. त्या संघराज्य रचनेवर हा थेट हल्ला आहे. लोकशाहीची ही हत्या आहे. पाहा माझ्याकडे 4 मिनिटं आहेत. पण मला 2 मिनिटं पुरेशी आहेत… तर तिकडून जास्त आवाज करू नका.. एक निवडून आलेलं सरकार आहे दिल्लीत.. विधानसभा आहे.. दिल्लीच्या लोकांनी मुख्य सचिवांना मतदान केलेलं नाही. उपराज्यपालांना मतदान नाही दिलेलं. उपराज्यपाल नाही जात मतं मागायला.. मतं मागतात ते केजरीवाल किंवा कोणी मुख्यमंत्री किंवा सरकार नाहीतर नेते…’

हे ही वाचा >> NCP: ‘जयंत पाटील.. पुण्यात अमित शाहांना भेटले?’, अजित पवारांचं मोठं विधान

‘तुम्ही सहा वेळा निवडणुका हरलात.. आजही दिल्लीच्या विधानसभेत तुमचे 5 आमदार नाही.. म्हणून आपण दिल्ली विधानसभा असो किंवा महाराष्ट्र असो.., प. बंगाल असो.. तामिळनाडू असो.. तुम्हाला त्यावर कब्जा करायचा आहे. सरकार कोण चालवणार? आपण जर लोकशाहीबाबत बोलणार असू..’

ADVERTISEMENT

‘माझे तिकडचे अनेक मित्र आहेत… मला वाटलं की, त्यांना जुने दिवस आठवतील. जे लोकशाहीबाबत मोठ्या-मोठ्या बाता मारायचे… पण मला तुमच्या डोळ्यात मला काहीही लज्जा दिसून आली नाही.’

ADVERTISEMENT

‘मला दोन ओळी आठवतात गोपालदास निरज यांच्या..’

‘मत पुछो इस दौर में क्या-क्या बेचा..’

‘आपण तर सगळं विकलं आहे.. सार्वजनिक क्षेत्रापासून ते लोकशाहीपर्यंत आमदार, खासदार, सरकारं..’

‘मत पुछो इस दौर में क्या-क्या बेचा..
आपके आँखो की शरम तक आपने बेची है’

‘तुम्ही दिल्लीची निवडणूक हरलात.. तुम्ही 2024 ची निवडणूक देखील हरणार आहात. India जिंकेल.. पंतप्रधान विश्वगुरू आहेत.. आपण मानता.. तुम्ही सगळ्यांनी त्यांना विश्वगुरू बनवून टाकलं आहे.. पण त्यांचा जो सन्मान होतो. लोकं त्यांना बायडेनपासून ते फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत.. ही सगळी लोकं जे गळाभेट घेतात.. ते नरेंद्र मोदींची नाही गळाभेट घेत.. एका महान लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानाची गळाभेट घेतात.. भारताच्या पंतप्रधानाची गळाभेट घेतात..’

हे ही वाचा >> SambhajiRaje: ‘चक्की पिसिंग.. पिसिंग..’ आता देवेंद्र फडणवीसांना संभाजीराजेंनीही डिवचलं!

‘आपण त्या महान परंपरेला.. महान संस्कृतीला तुम्ही संपवत आहात.’ असं म्हणत संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधला.

…अन् संजय राऊतांचा माइकच केला बंद

दरम्यान, या भाषणानंतर राऊत हे पंतप्रधान मोदी आणि टिळक पुरस्कारवर बोलू लागताच राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राऊतांना बोलू न देता संजय राऊत यांचा माइकच बंद करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सभागृहात राऊतांना अधिक बोलता आलं नाही.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT