‘मी मुद्दाम मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला बसलो..’, उद्धव ठाकरेंनी सगळंच सांगून टाकलं!

मुंबई तक

पाटणामधील बैठकीत उद्धव ठाकरे हे मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला बसल्याने त्यांच्यावर भाजपकडून टीका केली जात आहे. याचबाबत ठाकरेंनी स्वत: याबाबत नेमकं स्पष्टीकरण दिलं आहे.

ADVERTISEMENT

deliberately sat next mehbooba mufti shiv seen ubt chief uddhav thackeray bjp criticizing
deliberately sat next mehbooba mufti shiv seen ubt chief uddhav thackeray bjp criticizing
social share
google news

मुंबई: शिवसेना (UBT)पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईत शाखाप्रमुखांची बैठक घेतली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं की, ‘पाटण्याच्या बैठकीत मी मुद्दाम मेहबुबा मुफ्तीच्या (Mehbooba Mufti) बाजूला जाऊन बसलो..’ कारण याच मुद्द्यावरुन भाजपकडून (BJP) उद्धव ठाकरेंवर कालपासून टीका करण्यात येत आहे. ज्याला आता ठाकरेंनीही प्रत्युत्तर दिलं आहे. (deliberately sat next mehbooba mufti shiv seen ubt chief uddhav thackeray bjp criticizing)

‘मुद्दाम मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला बसलो..’ उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

‘कोरोना काळात एकाही मृतदेहाची विटंबना आम्ही होऊ दिली नाही. तुम्ही आमच्यावर आरोप करतायेत.. अरे निर्लज्जांनो.. मोदी साहेब नसते तर त्यांनी लस शोधली.. मी कधीच म्हटलं नाही की, मी लस शोधली. मोदींनी काय केलं घंटा बडवा, थाळ्या वाजवा, कोलांट उड्या मारा, बेडूक उड्या मारा.. त्यामुळे आम्ही वाचलो का?’

‘हिंदुत्व.. हिंदुत्व.. म्हणे.. काल मी गेलो होतो.. बघितलं मेहबुबा मुफ्ती आहेत. मी मुद्दाम त्यांच्या बाजूलाच जाऊन बसलो. हो आता कारण ते भाजपच्या लाँड्रीतून स्वच्छ झालेले आहेत. त्यांच्या बाजूला बसले की, आपण आजूबाजूचे पण स्वच्छ होऊ. म्हणजे तुमच्या बरोबर गेला की, स्वच्छ.. काय बेंबीच्या देठापासून बोलत होते देवेंद्र फडणवीस.. मग आम्ही प्रश्न विचारले तेव्हा मिरच्या का झोंबल्या तुम्हाला?’

‘तुम्ही जेव्हा मेहबुबा मुफ्तींसोबत बसला होतात तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटलं होतं का? नाही ना सुटलं.. मग आमचं कसं सुटेल? आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. पण तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडणार.’

‘काल मी मेहबुबा मुफ्तींना विचारलं की, आम्ही काँग्रेसबरोबर गेलो असं म्हणत आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणतात तेव्हा मी त्यांना तुमचं उदाहरण देतो. त्या म्हणाल्या.. हो मी ऐकलंय.. मी म्हटलं एक सांगा.. ते निर्लज्ज आहेत. ते तुमच्या बरोबर आले.. तुम्ही कशा त्यांच्याबरोबर गेल्या.’

‘त्यांनी सांगितलं की, भाजपने आम्हाला वचन दिलं होतं की, 370 कलम ते काढणार नाहीत. म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो होतो. या काही गोष्टी भेटल्याशिवाय कळत नााही.’

हे वाचलं का?

    follow whatsapp