“शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब

साहिल जोशी

इंडिया टुडे कॉनक्लेव्ह मुंबई २०२३ मध्ये देवेंद्र फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. २०१९ मध्ये शरद पवार यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायला सांगितले होते. शरद पवारांच्या सांगण्यावरूनच भाजपने राष्ट्रपती राजवट लावली, असा दावा फडणवासांनी केला.

ADVERTISEMENT

India today conclave mumbai 2023 : Devendra Fadnavis claim that Sharad Pawar suggested President's Rule in Maharashtra in 2019
India today conclave mumbai 2023 : Devendra Fadnavis claim that Sharad Pawar suggested President's Rule in Maharashtra in 2019
social share
google news

Devendra Fadnavis Sharad Pawar President Rule India Today Conclave Mumbai 2023 : 2019 मध्ये घडलेल्या सत्तानाट्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यात मोठा गौप्यस्फोट केला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची आयडियाच शरद पवार यांची होती. याबद्दलचा पडद्यामागे घडलेला सर्व घटनाक्रमही फडणवीसांनी सांगितला. (in 2019 Sharad Pawar suggested President’s Rule in Maharashtra, said devendra fadnavis)

‘India Today Conclave Mumbai 2023’मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. 2019 मध्ये पडद्यामागे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपात झालेल्या चर्चेबद्दल फडणवीसांनी मोठा गौप्यस्फोट केला. 2019 जे घडलं, त्यात शरद पवारांची भूमिका काय होती? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “पहिली गोष्ट म्हणजे पूर्ण सत्य ऐकण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल. कारण राजकारणात हे पूर्णपणे मांडण्याची एक वेळ असते. तुम्हाला योग्य वेळी हीट करायचं असतं.”

2019 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीसांना काय प्रस्ताव दिला?

“मी इतकंच सांगेन २०१९ मध्ये जेव्हा शिवसेनेने आम्हाला धोका देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली. आमच्या लक्षात आले की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची खुणावतेय. ते आता आपल्यासोबत येणार नाही. त्यावेळी आम्ही विचार करत होतो की यावर उपाय काय? त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही लोकांनी माझ्यासमोर प्रस्ताव ठेवला की, आम्ही येऊ शकतो कारण आम्हाला तीन पक्षाचं सरकार नकोय. आम्हाला स्थिर सरकार हवं. मी त्यांना सांगितलं की, चर्चा करून सांगतो.”

हेही वाचा >> Shiv Sena च्या युती-आघाडीचा काय आहे इतिहास, कसं वापरलंय धक्कातंत्र?

“नंतर चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांसोबत आमची बैठक झाली. शरद पवारांनी हे सांगितलं की आम्ही भाजपसोबत येऊ. माझ्यावर आणि अजित पवारांवर जबाबदारी टाकली गेली. आम्ही युती कशी असेल, कुणाला कोणतं खातं मिळेल, कुणाला कोणता जिल्हा मिळेल, हे ठरवलं. युती करण्याच्या प्रक्रियेला वेळ लागतो. तर त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल. त्यानंतर विचार करून राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली.”

हे वाचलं का?

    follow whatsapp