Devendra Fadnavis : 'काँग्रेसची पुण्याई सोडून नेते आमच्यासोबत का येतात?', फडणवीसांनी कारणं सांगितली
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशी ओळख असलेला अशोक चव्हाण यांच्यासारखा नेता भाजपसोबत का येत आहे. त्याचे आत्मचिंतन करण्याची गरज काँग्रेसला असल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना लगावला.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'काँग्रेसला आत्मचिंतन करण्याची गरज'
'काँग्रेसची पुण्याई सोडून नेते भाजपमध्ये का येतात'
काँग्रेसमध्ये कोणाचा मेळ कोणाला नाही
Devendra Fadnavis : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या अशोक चव्हाण (Former cm Ashok Chavan) यांनी काल काँग्रेसचा (Congress) राजीनामा देऊन आज भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये (BJP) पक्ष प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, 'काँग्रेसची पुण्याची सोडून हे नेते आता भाजपमध्ये का येत आहेत, त्याचं आत्मचिंतन आता काँग्रेसनं करायला हवं' असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
ADVERTISEMENT
पटोलेंना प्रवेश दिला होता
उपमुख्यमंत्री देवेंद्र फणडवीस यांनी इतर पक्षातील नेत्यांच्या भाजपप्रवेशाविषयी बोलताना त्यांनी नाना पटोलेंनाही टोला लगावला आहे. आज नाना पटोले जरी भाजपवर टीका करत असले तरी, नाना पटोलेंना आम्ही भाजपमध्ये प्रवेश दिला होता. मात्र ते कोणत्याही पक्षात टिकू शकत नाही असा टोलाही त्यांनी त्यांना लगावला.
हे ही वाचा >> LIVE : भाजपमध्ये मी प्रामाणिकपणे काम करेन : अशोक चव्हाण
काँग्रेसची पुण्याई
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसेवर टीका करताना त्यांनी काँग्रेसला आत्मचिंतन करण्याचाही सल्लाही दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, 'काँग्रेसला त्यांना त्यांचा पक्ष सांभाळता येत नाही, नेते सांभाळता येत नाहीत. नेत्यांची मोठ बांधता येत नाही. आज हे सगळे मोठे नेते, इतक्या वर्षांची काँग्रेसची पुण्याई सोडून आमच्यासोबत का येत आहेत? त्याचं कारण काय आहे त्याचाही विचार काँग्रेसने करायला पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
हे वाचलं का?
काँग्रेस दिशाहीन
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'कारण काँग्रेसमध्ये जे वातावरण आहे त्यामुळेच ते आज आमच्याकडे येत आहेत. आज काँग्रेस कोणत्या दिशेने चालली आहे. हेच कोणाला समजत नाही असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.
भाजपला विरोध देशाला विरोध
भाजपला विरोध करता करता देशाच्या विकासाला कधी आपण विरोध करायला लागलो हेच काँग्रेसला समजत नाही अशीही खोचक प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. काँग्रेसकडून भाजपच्या काही योजनांविषयी, काही गोष्टींविषयी विरोध केला जातो. त्यामुळे त्यांनी भाजपला विरोध करता करता त्यांच्याकडून देशाच्या विकासाला विरोध केला जाऊ लागला असंही त्यांनी यावेळी सांगितले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Ashok chavan : आदर्श घोटाळा अन् चव्हाण मुख्यमंत्री पदावरून पायउतार
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT