Manoj Jarange: ‘भाजप विद्रूप करून टाकलाय…’, मनोज जरांगेंची थेट फडणवीसांवर जहरी टीका
Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांनी भाजप विद्रूप केला आहे. अशी जहरी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पत्रकार परिषदेत जरांगेंनी फडणवीसांवर बरीच टीका केली आहे.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Maratha Reservation: अंतरवाली सराटी: ‘एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे.. त्याच्याकडे बघावं लागेल.. बाळा तू लोकांना थांबव तू राज्य बिघडवू नको.. एक तर सगळा भाजप विद्रूप करून टाकलाय तू. असे रंगीबेरंगी आणून ठेवलेत त्या सरकारमध्ये.’ अशी जहरी आणि थेट टीका मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केली आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अंतरवाली-सराटी येथे उपोषणाला बसलेल्या जरांगेनी आज (31 ऑक्टोबर) संध्याकाळी पत्रकार परिषद घेत सरकारवर आणि विशेषत: देवेंद्र फडणवीसांवर तुफान टीका केली आहे. (devendra fadnavis has damaged the whoole bjp in maharashtra manoj jarang directly criticized fadnavis maratha reservation)
ADVERTISEMENT
मनोज जरांगे-पाटलांची देवेंद्र फडणवीसांवर नेमकी काय टीका?
‘देवेंद्र फडणवीस यांनी उभ्या आयुष्यात एवढंच केलं. कोण टार्गेट केलं.. कोण कोणाचं काय केलं.. घरं कोणी जाळली हे तुम्हाला माहिती का? मराठ्यांनी जाळली का कोणी जाळली ते.. तुमचेच लोकं घुसवता आणि तुम्ही जाळपोळ करता. अरे भाजप तुमच्यामुळेच संपायला लागलाय ना. इतर राज्यात एवढे मागे का आले आहेत? हे असले नमुने आहेत ना.. मोठ्या बढाया हाणणारे..’
‘निधी आमचाय, कर जनेतचा आहे.. फुकट पैसे खायचे.. बासुंदी खा, गुलाबजाम खा.. फुकट खायचं.. यांना आता सुचेना झालंय. आणि आता म्हणतायेत 307 करेन वैगरे.. कर तुला काय करायचं ते.. तुम्ही आता ठरवलंच ना राज्यात अशांतता करायची ते.. तुमची बुद्धी जेवढी असेल तेवढंच तुम्ही बोलणार आहात. तुम्ही आम्हाला हक्काचं आरक्षण द्या.. आम्ही फक्त उद्यापर्यंत वाट बघू नाहीतर उद्यापासून पाणी देखील बंद करू.’
हे ही वाचा >> Manoj Jarange: ‘एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय, त्यांनीच..’, जरांगे-पाटील संतापले; तुफान टीका
‘सरकारला दुसरं कामच काय आहे.. बांगड्या भरल्यावानी चाळे करायचे… यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या सगळ्यांच्या.. हे मर्दासारखं चालवतच नाही.. आतून काड्या करायच्या.. कुठे नेट बंद कर.. कुठे काय बंद कर. मराठ्यांचं आंदोलन आता थांबत नाही. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न केला तर आमचा पण नाईलाज आहे. आम्हाला पण मर्यादा सोडाव्या लागतील. याला जबाबादार सरकार राहणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री. त्यातील एक उपमुख्यमंत्री जास्त जबाबदार राहणार आहे. कारण त्याला अशा काड्या करायची लय सवय आहे.’
’40 वर्ष झाले आमचे फुकट आरक्षण खाता.. परत म्हणता आम्ही रस्त्यावर उतरू.. उतर तू रस्त्यावर.. आमच्या अंगावर यायचं नाही.. नाही तर त्याला सरकार जबाबदार राहील. त्यातला उपमुख्यमंत्री तर शंभर टक्के जबाबदार राहणार.’
हे वाचलं का?
त्यातला एक उपमुख्यमंत्री तर कलाकार आहे.. त्याच्याकडे बघावं लागेल.. बाळा तू लोकांना थांबव तू राज्य बिघडवू नको.. एक तर सगळा भाजप विद्रूप करून टाकलाय तू. असे रंगीबेरंगी आणून ठेवलेत त्या सरकारमध्ये. तुमचा नियमच आहे पहिल्यापासून.. तुम्हाला लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही. इतके खोडीचे आहेत तुम्ही.
‘मी ओबीसी बांधवांना सांगतो तुम्ही विनाकारण यांचं ऐकून रस्त्यावर येऊ नका.. यांचा पहिल्यापासूनचा इतिहास आहे.. यांनी गोरगरीबांना झुंजायला लावलंय एकमेकांविरोधात.. यांचा पहिल्यापासून इतिहास आहे.. ते घरात बसून मलिदा खातात.. यांनी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये झुंज लावली तर यांना घरातच बसू द्यायचं नाही.. जो मजा बघतो ना.. त्याच्याच मागे लागायचं आता.’
हे ही वाचा >> Maratha Reservation: ‘तेच मराठा आरक्षणाचे मारेकरी’, मुख्यमंत्री शिंदेंचा थेट उद्धव ठाकरेंवरच आरोप
‘आता म्हणतो केसेस करेन.. तुला दुसरं काहीच येत नाही का? राज्य चालवायला निघाले… स्वप्न बघतात.. मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान होणार.. काय होणार पुन्हा पंतप्रधान ते.. हा असं वागल्यावर..’ अशा शब्दात मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
आता मनोज जरांगे पाटील यांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT