Devendra Fadnavis : गोहत्या करणाऱ्यांवर मकोका लावणार, काय आहे मकोका, गुन्हेगारांना धाक का?

मुंबई तक

MCOCA Act: राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगप्रताप यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा करण्यात आली आहे. या भूमिकेतून सरकार याप्रकरणी कठोर भूमिका घेणार असल्याचं स्पष्ट होतंय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गोहत्येच्या प्रकरणांमध्ये पुन्हा पुन्हा सापडणाऱ्यांवर मकोका लावणार

point

देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात उत्तर देताना माहिती

point

मकोका कायदा काय? गुन्हेगारांना का आहे धाक?

Devendra Fadnavis : सरकारने गोवंश तस्करीच्या प्रकरणात कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. गोहत्येच्या प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्यां लोकांवर राज्य सरकार कठोर कारवाई करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली.  एखादा आरोपी गोहत्येच्या प्रकरणांमध्ये वारंवार पकडला जात असेल, तर त्याच्यावर आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली जाणार आहे. 

वारंवार सापडणाऱ्यांवर मकोका

गोहत्येच्या घटनांवर राज्य सरकार बारकाईनं लक्ष ठेवून आहे, आणि हे गुन्हे रोखण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलें. गायींच्या तस्करीच्या प्रकरणात वारंवार पकडल्या जाणाऱ्या गुन्हेगारांवर आता थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. 

हे ही वाचा >>Pune Bus Fire : अपघात नाही, 'तो' घातपात! मालकाचा राग आल्यानं ड्रायव्हरने केला होता प्लॅन, CCTV मध्ये काय दिसलं?

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगप्रताप यांनी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी ही घोषणा करण्यात आली आहे. गोहत्येची प्रकरणं थांबवण्यासाठी राज्य सरकार कुठल्याही प्रकारची कामकुचराई करणार नसल्याचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानातून अधोरेखित झालं आहे. MCOCA अंतर्गत कारवाई केल्यानं, या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या लोकांवर कठोर शिक्षा होण्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. 

मकोका म्हणजे काय?

MCOCA हा 1999 मध्ये लागू केलेला एक विशेष कायदा आहे. या कायद्याचा उद्देश संघटित गुन्हेगारी आणि दहशत करणाऱ्यांचा बंदोबस्त करणे असा आहे. हा कायदा राज्य सरकारला विशेष अधिकार प्रदान करतो. 
 

हे वाचलं का?

    follow whatsapp