Exclusive: 'धनू भाऊ दिसत असून आंधळं झाला का? तुमचं 54 हजार फुटावरचं विमान जरा...', सुरेश धस तुफान बरसले

मुंबई तक

Suresh Dhas: मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत भाजप आमदार सुरेश धस यांनी आता थेट धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.

ADVERTISEMENT

सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका
सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर जोरदार टीका
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सुरेश धस यांनी मुंबई Tak च्या मुलाखतीत बोलताना मुंडेंवर केली तुफान टीका

point

धनंजय मुंडेंवर केली जहरी टीका

point

थेट घेतलं वाल्मिक कराडचं नाव

बीड: बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ज्यानंतर आता या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. याच दरम्यान, सुरेश धस यांनी मुंबई Tak ला एक्स्क्लुझिव्ह मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच हल्ला चढवला. (did dhananjay munde go blind while he was still visible bring your plane down from 54000 feet suresh dhas stormy criticism)

बीड जिल्ह्यात जे गुन्हे घडतायेत त्याला वाल्मिक कराड जबाबदार असल्याचं म्हणत सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडेंना निशाणा साधला. पाहा मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत धस नेमकं काय म्हणाले.

सुरेश धस यांची धनंजय मुंडेंवर तुफान टीका

'राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, मी कोणालाही सोडणार नाही. जी मागणी केली आहे की, एसआयटी नेमताना आयजी स्तरावरील अधिकारी असावा. ही मागणी मी केली होती.'

हे ही वाचा>> Dhananjay Munde Beed : बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंच्या हातातून जाणार का? CM फडणवीस, अजितदादा काय निर्णय घेणार?

'धनंजय मुंडे साहेब अजून 54 हजार फुटावर आपलं विमान असतं ना.. म्हणजे विमान जे आहे ते 54 हजार फुटावर आहे. तसं मला वाटतं की, धनंजय मुंडे साहेबांचं विमान हे 54 हजार फुटापेक्षा 1 लाख 8 हजार फुटावर गेलं आहे. माझी अजून त्यांना विनंती आहे की, धनूभाऊ तुम्ही असे नव्हते ओ...' 

हे वाचलं का?

    follow whatsapp