Dhananjay Munde Beed : बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडेंच्या हातातून जाणार का? CM फडणवीस, अजितदादा काय निर्णय घेणार?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृन हत्येनंतर हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. विरोधकांबरोबरच सत्ताधारी आमदारांनी हा मुद्दा लावून धरला. या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचं नाव विरोधकांकडून अनेकदा घेण्यात आलं. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर झालेलं पहिलंच अधिवेशन मस्साजोगच्या प्रकरणामुळे गाजलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
बीडचं पालकमंकमंत्रिपद धनंजय मुंडेंच्या हातून जाणार?
मस्साजोग प्रकरणाचे राजकीय परिणाम काय होणार?
Beed Guardian Minister : गेल्या अनेक दिवसांपासून बीडच्या मस्साजोगमध्ये घडलेल्या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाची चर्चा राज्यात सुरु आहे. या घटनेनंतर राजकारण चांगलंच तापलंय. या सगळ्या प्रकरणात विरोधकांकडून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जात आहे. अजित पवार मस्साजोगला गेलेले असताना धनंजय मुंडे यांना मंत्रीमंडळातून काढून टाकण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर आता पालकमंत्रिपदाची जबाबदारी कुणाला मिळणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. मंत्र्यांची संख्या अधिक असल्यानं जिल्हा एक दावेदार अनेक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मस्साजोगच्या वादानंतर बीडचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांना मिळणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्यानंतर झालेलं पहिलंच अधिवेशन गाजलं ते मस्साजोगच्या प्रकरणामुळे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निघृन हत्येनंतर हा मुद्दा विरोधकांनी उचलून धरला. विरोधकांबरोबरच सत्ताधारी आमदारांनी हा मुद्दा लावून धरला. या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचं नाव विरोधकांकडून अनेकदा घेण्यात आलं. धनंजय मुंडे देखील अधिवेशनात दिसले नाहीत. हे प्रकरण गाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली.
बीडच्या एसपींची फडणवीसांनी बदली केली. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून करणार असल्याचं देखील फडणवीसांनी जाहीर केलं. असं असलं तरी धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाचं नाव या सगळ्या प्रकरणात घेतलं जात असल्यानं मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवून या प्रकरणाची चौकशी कशी होणार असा प्रश्न देखील विरोधकांकड़ून उपस्थित करण्यात आला.
हे ही वाचा >> CM Devendra Fadnavis यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट टाकणाऱ्या 12 सोशल मिडीया युजर्सविरोधात FIR, यादीत कोणकोणती नावं?
दुसरीकडे अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. अजित पवारांनी गावकऱ्यांकडून घटनाक्रमाची माहिती घेतली. यावेळी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली. रविवारी अजित पवारांचा नागरी सत्कार बारामतीत पार पडला यावेळी देखील अजित पवारांनी मस्साजोगच्या घटनेतील मास्टरमाईंडला सोडणार नसल्याचं ते म्हणाले.










