‘गोपीनाथ मुंडे स्मारक आता बनवू नका’; पंकजा मुंडे भडकल्या, मेळाव्यातून भाजपवर तोफ

मुंबई तक

ADVERTISEMENT

dont build gopinath munde memorial now pankaja munde expresses anger at bjp criticism from dasara Dussehra meeting
dont build gopinath munde memorial now pankaja munde expresses anger at bjp criticism from dasara Dussehra meeting
social share
google news

Pankaja Mumnde: माजी मंत्री आणि भाजप नेत्या (BJP Leader) पंकजा मुंडे यांनी आज बीडमधील दसरा मेळाव्यानिमित्त संबोधित केले. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय प्रवासावर बोलत आता मी घरी बसणार नाही. आता मी तुमच्यासाठी मैदानात उतरणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. पंकजा मुंडे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी कोणाचंही नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी गोपीनाथ गडाचा विषय काढून तो मी बांधला असला तरी अजूनही गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) स्मारक सरकारकडून बांधण्यात आले नाही अशी खंत व्यक्त करुन दाखवली.(dont build gopinath munde memorial now pankaja munde expresses anger bjp criticism dasara dussehra meeting)

ADVERTISEMENT

गोपीनाथ गड मी बांधला पण…

माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडच्या दसरा मेळाव्यात बोलताना आपल्या राजकीय भवितव्यावर त्यांनी आपलं मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी सांगितले की, येथील लोकांसाठी आणि येथील जनतेसाठी गोपीनाथ गड मी तीन महिन्यात बांधला. मात्र ज्या गोपीनाथ मुंडे यांनी लोकांच्या मनाता स्वाभिमान जागृत केला. त्यांचे स्मारक मात्र अजूनही सरकारकडून बनवण्यात आले नाही. त्यामुळे आता त्यांचे स्मारक बनवू नकाच अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

हे ही वाचा >> Nilesh Rane : राणेंच्या पुत्राचा ‘राजकीय संन्यास’; नीलेश राणेंनी का सोडलं राजकारण?

गोपीनाथ मुंडे स्मारक नको

गोपीनाथ मुंडे यांना मंत्री पद हे काही वर्षापर्यंत मिळाले असले तरी त्यानंतरही त्यांचे स्थान राज्यातील जनतेच्या मनात कायम आहे. कारण गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात आणि केंद्रात काम केले असले तरी त्यांनी जनसामान्यांची साथ कधी सोडली नाही. मात्र त्याच गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक अजूनही सरकारकडून का बनवण्यात आले नाही. ते स्मारक बनवण्यात आले नाही आणि आताही ते बनवू नका कारण त्यांचे खरं स्मारक हे सामान्य जनतेच्या मनात कायम असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

हे वाचलं का?

मनातील खदखद

गोपीनाथ मुंडे यांना फक्त चार साडेचार वर्षे खुर्ची मिळाली होती. मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही सलग दहा वर्षे गोपीनाथ मुंडे यांचे स्थान लोकांच्या मनात कायम राहिले आहे. त्यानंतर मी गोपीनाथ गड तीन महिन्यात बनवला मात्र गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक किती तरी वर्षे अजूनही बनवण्यात आले नाही, आणि आता ते बनवूही नका अशीही त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवली.

हे ही वाचा >> पुण्यात गरबा खेळताना राडा! डोक्यात घातली बिअर बाटली, कारण…

कोयता दूर करा

गोपीनाथ मुंडे जाऊन किमान 10 वर्षे झाली तरी स्मारक बनवण्यात आले नाही. त्यामुळे आता हे स्मारक बनवूच नका. जर आता काही बनवायचे असेल तर मात्र त्यांच्यासाठी आणि सामान्य शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये म्हणून काही तरी बनवा. त्याच बरोबर ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता दूर जाऊन त्यांच्या शिक्षणासाठी काही तरी बनवा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्याच बरोबर काही तरी बनवायचं असेल तर धर्माच्या आणि जातीच्या भिंती पाडा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT