CM Eknath Shinde: 'टोलवाटोलवी करू नका', मुख्यमंत्री शिंदे एवढे कोणावर संतापले?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्मण हाके यांनी कोंडीत पकडले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुुंबई आणि नजीकच्या जिल्ह्यांमध्ये रस्त्यांवर प्रचंड खड्डे

point

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे सरकारवर टीका

point

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले

CM Eknath Shinde angry: मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रलंबित कामं मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आता बैठकांचा धडाका सुरू केलं आहे. दरम्यान, यावेळी कारणं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलीच कानउघाडणी केली असल्याचं आता समोर आलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर रस्त्यावरील खड्डे हा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो. त्यामुळेच आता या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देत स्वत: मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं आहे. (dont cheat road potholes may add to difficulty in vidhan sabha election cm eknath shinde was angry with the officials)

रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे संतापले

मुंबईला जोडणाऱ्या एमएमआर (MMR) रिजन म्हणजेच ठाणे, रायगड, पालघर, भिवंडी, जेएनपीटी रस्त्यावरील खड्डे आणि प्रलंबित कामांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्यांबाबतच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली असल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा>> Ladki Bahin Yojana : खात्यात एक रुपया पोहोचलाच नाही, 'त्या' 16 लाख महिला अर्जदारांचं काय होणार?

रस्ते दुरूस्तीच्या कामात जर कुठल्या शासकीय यंत्रणांनी अडथळा आणला किंवा कामचुकारपणा केला तर त्याच्यावर एफआयआर दाखल करा अशी तंबीच मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'तातडीने कामं सुरू करा, कारणं सांगून टोलवाटोलवी करू नका..' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना झापलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे हे बरेच संतापल्याचे दिसून आलं. 

रॅपिड क्वीक सेटिंग हार्डवर विथ एम 60 या पद्धतीचा वापर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Aishwarya Rai: आधी ग्रे, आता डायमंड घटस्फोटाची चर्चा; ऐश्वर्या-अभिषेक बच्चन खरंच होणार वेगळे?

स्थानिक कलेक्टर, एसपी यांनी कामात कोणताही अडथळा येणार नाही, वाहनांची, प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेशही यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

ADVERTISEMENT

ठाणे जिल्ह्यात रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य

ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर शहरातील सर्व प्रमुख रस्ते तसेच शहराच्या अंतर्गत रस्त्यांवर जीवघेणे खड्डे झाल्याने नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना सातत्याने घडत असताना काही मिनिटांचे अंतर तासंतास लागत आहे. विशेष म्हणजे, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत, तर सर्वच विभाग तसेच महापालिका प्रशासन सर्व काही जाणूनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांमध्ये तीव्र संताप आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवर वाहनाने चालणे अत्यंत अवघड व धोकादायक आहे. खड्ड्यांमध्ये वाहने ये-जा करताना दिसत आहेत. नुकतेच कल्याणमधील टिळक चौकात खड्ड्यात दोन ज्येष्ठ नागरिक पडल्याने नागरिकांचे हात-पाय फ्रॅक्चर झाले आहेत. त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT