Pankaja Munde : अजित पवारांना भाजपने सोबत घेण्यामागे ‘हे’ कारण, पंकजा मुंडेंनी सगळंच सांगितलं

मुंबई तक

ADVERTISEMENT

pankja munde ajit pawar
pankja munde ajit pawar
social share
google news

Pankja Nunde : छत्रपती संभाजीनगरमधून घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन पंकजा मुंडे यांनी आज शिव-शक्ती परिक्रमा सुरू केली आहे. त्यांच्या या परिक्रमा यात्रेला प्रतिसादही उदंड लाभत आहे. त्यानिमित्ताने त्या कित्येक दिवसांनंतर आता माध्यमांबरोबर चर्चा करत आहेत. यानिमित्ताने त्यांनी राज्यातील सध्याच्या राजकारणावर बोलताना बदललेल्या सत्ताधारी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारबद्दल बोलताना महत्वाच्या गोष्टींवर लक्ष वेधून घेतले आहे. (reason bjp took ajit pawar lok sabha elections, explains pankaja munde)

सरकार उलथवून टाकले

पंकजा मुंडे यांनी राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीविषयी बोलताना म्हणाल्या की, उद्धव ठाकरे यांचे सरकार उलथवून टाकल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाजपबरोबर सत्तेत घेण्याच्या निर्णय प्रक्रियेत मी नव्हते.

भाजपची गरज

त्यामुळे या निर्णयाविषयी मला जास्त काही सांगता येणार नाही. मात्र ज्यावेळी एकनाथ शिंदे भाजपबरोबर आले होते, त्यावेळी भाजपची गरज होती हे स्पष्टपणे दिसत होते. कारण त्यावेळी भाजपला सत्तेत सहभागी होणं महत्वाचे होते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Pankja Munde : ‘हे तीनही नेते प्रचंड तणावामध्ये’, पंकजाताईंनी समस्यांचा डोंगर दाखवला

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन निर्णय

तर त्यांनी अजित पवार यांच्याविषयी बोलताना सांगितले की, या दोन्ही निर्णयाच्या प्रक्रियेत मी नसल्यामुळे त्याविषयी काही स्पष्टपणे सांगता येणार नाही. मात्र त्यामागे लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला गेला असेल. कारण भाजपला लोकसभेला विरोधकच नसला पाहिजे. त्यामुळे अजित पवार यांना सत्तेत घेण्यामागे तेच एक कारण असल्याचेही त्यांनी सांगितले.

विरोधक कमजोर असावा

आपला विरोधक कमजोर असावा असं प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मात्र यापुढील राज्याचे राजकारण काय असेल ते सांगता येणार नाही असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Rohit Pawar : ‘पक्ष, चिन्ह आम्हालाच मिळणार’, निवडणूक आयोगाच्या निकालाआधी रोहित पवारांचा दावा

    follow whatsapp

    ADVERTISEMENT