Mahadev Jankar: ‘BJP ला वाटतं डोळे मिटून… अजित पवारांना सोबत घेऊन..’, माजी मंत्री संतापले
राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांनी अजित पवारांना भाजपने सरकारमध्ये सामील करून घेतल्याने जोरदार टीका केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.
ADVERTISEMENT
Latest news in Maharashtra Politics: भरत केसरकर, सिंधुदुर्ग: राष्ट्रीय समाज पक्षाचे (RSP) अध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री महादेव जानकर (Mahadev Jankar) हे सातत्याने भाजपवर (BJP) हल्ला चढवत आहेत. आता त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) सोबत घेण्याच्या निर्णयावरुन भाजपवर जोरदार टीका केली आहे. ‘जनतेच्या दरबारात गेल्यावर भाजपला याची शिक्षा मिळेल. भाजपला वाटत असेल मांजर डोळे झाकून दूध पिते. मात्र, जनतेला हे माहीत आहे.’ असं म्हणत महादेव जानकरांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. ते सिंधुदुर्गमध्ये बोलते होते. (ex minister mahadev jankar rsp criticized bjp over ajit pawar and ncp alliance in sindhudurga maharashtra politics news latest)
ADVERTISEMENT
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबुतीसाठी महादेव जानकर हे आता राज्यात फिरत आहेत. त्याच दृष्टीने त्यांच्या प्रचाराला देखील त्यांनी सुरुवात केली. 2014 साली राज्यात भाजपचं जे सरकार आलं होतं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी जानकरांना मंत्रिमंडळात स्थान दिलं होतं. मात्र, 2022 साली भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर जानकरांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं नाही. तेव्हापासून महादेव जानकार हे सातत्याने भाजपला टार्गेट करत आहेत.
हे ही वाचा >> NCP : शरद पवारांना बघून अजित पवारांनी वाटच बदलली; कार्यक्रमात काय घडलं?
मात्र, आता त्यांनी थेट भाजपवरच टीका करण्यास सुरुवात केली आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात जानकरांनी प्रचार केलेला आणि त्यांच्या पक्षाने निवडणूक लढवली होती. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपने सोबत घेतल्याने जानकर हे खूपच संतापले आहेत.
हे वाचलं का?
भाजपवर नेमकी काय टीका
‘जनतेच्या दरबारात गेल्यावर भाजपला याची शिक्षा मिळेल. भाजपला वाटत असेल मांजर डोळे झाकून दूध पिते. मात्र, जनतेला हे माहीत आहे. अजित पवारांना सोबत घेणं जनतेला पटलेलं नाही. काहीही करून सत्ता आपल्याकडे राहावी असं भाजपला वाटतं. मात्र जनता याला खीळ घातल्याशिवाय राहणार नाही.’ असं म्हणत जानकरांनी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
संभाजी भिडेंवरही साधला निशाणा
‘वारंवार युग पुरुषांवर बोलून संभाजी भिडेंकडून त्यांचा अपमान केला जातोय. भिडेंना यातून काय अभिप्रेत आहे? समाजा-समाजामध्ये त्यांना भांडणं लावायची आहेत का? असा प्रश्न पडतो. त्यामुळे संभाजी भिडेंवर योग्य ती कारवाई शासनाने करावी अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे.’ असंही यावेळी जानकर म्हणाले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Narendra Modi Pune visit :शरद पवार एकटेच बसले, मोदी पुण्यात आल्यानंतर काय घडलं?
महादेव जानकर महाविकास आघाडीसोबत जाणार का?
दरम्यान, यावेळी महादेव जानकर यांना असाही प्रश्न विचारण्यात आला की, ते जर भाजपविरोधात निवडणुका लढवणार असल्यास ते महाविकास आघाडीसोबत जाणार का? यावर बोलताना जानकर म्हणाले की, ‘आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. महाविकास आघाडीने अजून आम्हाला काही सांगितले नाही. ना विश्वासात घेतलं. त्यामुळे सध्यातरी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत.’ पण यावरून आगामी काळात महाविकास आघाडीसोबत जाण्याचे संकेत जानकर यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT