Exit Poll 2023: लोकसभेची सेमीफायनल, पाहा 5 राज्यांचा Poll of Polls, कोणत्या राज्यात कोणाची सत्ता?
5 State Assembly Election Poll Of Polls: लोकसभा 2024 च्या निवडणुकीआधी पाच राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये नेमकं कोण बाजी मारणार याबाबत सर्वांचीच उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पाहा कोणत्या चॅनलचा पाच राज्यांबाबतचा एक्झिट पोल काय आहे.
ADVERTISEMENT
5 State Assembly Election Poll Of Polls Exit Poll 2023: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यातील निवडणुका आता पार पडल्या आहेत. तेलंगणामध्ये आज (30 नोव्हेंबर) मतदान पार पडल्यानंतर या पाचही राज्यातील निवडणुका पार पडल्या. आता या पाचही राज्यांचे एक्झिट पोल हे समोर आले आहेत. लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या या पाचही राज्यात नेमकी कोणाची सत्ता येणार हे एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर आलं आहे. याशिवाय इतरही चॅनल्सने याबाबत अंदाज वर्तवले आहेत. याचाच Poll of Polls आपण आता सविस्तरपणे पाहूया.
ADVERTISEMENT
1. Chhattisgarh Poll of Polls 2023 : छत्तीसगडचा पोल ऑफ पोल्स
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजपला 36 ते 46 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 1 ते 5 जागा मिळतील
हे वाचलं का?
पाहा काय आहे छत्तीसगडचा Poll of Polls
इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?
ADVERTISEMENT
News 18- जन की बातच्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 34-45 जागा मिळतील. तर काँग्रेसला 42 ते 53 जागा आणि इतरांना 0 ते 3 जागा मिळतील.
ADVERTISEMENT
News24-टुडेज चाणक्यच्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 36-38 जागा मिळतील. तर काँग्रेसला 41 ते 53 जागा आणि इतरांना 0 ते 4 जागा मिळतील.
ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 36-48 जागा मिळतील. तर काँग्रेसला 41-53 जागा आणि इतरांना 04 जागा मिळतील.
Tv9- Polstratच्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 35-45 जागा मिळतील. तर काँग्रेसला 40 ते 50 जागा आणि इतरांना 00 ते 03 जागा मिळतील.
रिपब्लिक-Matrize च्या सर्वेनुसार भाजपला छत्तीसगडमध्ये 34-42 जागा मिळतील. तर काँग्रेसला 44 ते 52 जागा आणि इतरांना 00 ते 02 जागा मिळतील.
2. MP Poll of Polls 2023 : मध्य प्रदेशचा पोल ऑफ पोल्स
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 9 ते 18 जागा मिळतील
पाहा काय आहे राजस्थानचा Poll of Polls
इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?
News 18- जन की बातच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 100-123 जागा मिळतील. तर काँग्रेसला 102 ते 125 जागा आणि इतरांना 5 जागा मिळतील.
टाइम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 105-117 जागा मिळतील. तर काँग्रेसला 109 ते 125 जागा आणि इतरांना 1 ते 5 जागा मिळतील.
ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 88-112 जागा मिळतील. तर काँग्रेसला 113-137 जागा आणि इतरांना 2-8 जागा मिळतील.
Tv9- Polstratच्या सर्वेनुसार भाजपला मध्य प्रदेशमध्ये 106-116 जागा मिळतील. तर काँग्रेसला 111 ते 121 जागा आणि इतरांना 6 जागा मिळतील.
3. Rajasthan Poll of Polls 2023 : राजस्थानचा पोल ऑफ पोल्स
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार भाजपला 80 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 86 ते 106 जागा मिळतील. याशिवाय इतरांना 9 ते 18 जागा मिळतील
इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?
News 18- जन की बातच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 100-122 जागा मिळतील. तर काँग्रेसला 62 ते 85 जागा आणि इतरांना 14 ते 15 जागा मिळतील.
टाइम्स नाऊ ईटीजीच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 108-128 जागा मिळतील. तर काँग्रेसला 56 ते 72 जागा आणि इतरांना 13 ते 21 जागा मिळतील.
PMARQच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 105-125 जागा मिळतील. तर काँग्रेसला 69 ते 81 जागा आणि इतरांना 05 ते 15 जागा मिळतील.
ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 60 जागा मिळतील. तर काँग्रेसला 137 जागा आणि इतरांना 02 जागा मिळतील.
Tv9- Polstratच्या सर्वेनुसार भाजपला राजस्थानमध्ये 100-110 जागा मिळतील. तर काँग्रेसला 90 ते 100 जागा आणि इतरांना 05 ते 15 जागा मिळतील.
4. Telangana Poll of Polls 2023 : तेलंगणाचा पोल ऑफ पोल्स
तेलंगणा निवडणुकीचा इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल उद्या होणार जाहीर
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडिया एक्झिट पोल जाहीर करत असतानाच तेलंगणामध्ये मतदान हे सुरू होतं. त्यामुळे तेलंगाणाचा एक्झिट पोल हा उद्या (1 डिसेंबर) जाहीर केला जाणार आहे.
पाहा काय आहे तेलंगणाचा Poll of Polls
इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?
टाइम्स नाऊ सीएनएक्सच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 7 जागा मिळतील. तर काँग्रेसला 37 जागा आणि बीआरएसला 66 जागा मिळतील.
न्यूज एक्स एनटीएच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 6 जागा मिळतील. तर काँग्रेसला 46 जागा आणि बीआरएसला 57 जागा मिळतील.
ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 5 जागा मिळतील. तर काँग्रेसला 53 जागा आणि बीआरएसला 54 जागा मिळतील.
न्यूज नेशनच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 3 जागा मिळतील. तर काँग्रेसला 53 जागा आणि बीआरएसला 55 जागा मिळतील.
टी न्यूजच्या सर्वेनुसार भाजपला तेलंगणामध्ये 6 जागा मिळतील. तर काँग्रेसला 39 जागा आणि बीआरएसला 60 जागा मिळतील.
5. Mizoram Poll of Polls 2023 : मिझोरमचा पोल ऑफ पोल्स
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल
इंडिया टुडे- एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोलनुसार भाजपला 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 2 ते 4 जागा मिळतील. याशिवाय ZPM ला 28 ते 35 जागा आणि MNF पक्षाला 3-7 जागा मिळतील
इतर चॅनल आणि सर्वेक्षण संस्थांचा नेमका एक्झिट पोल काय?
News 18- जन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजपला मिझोरममध्ये 0 ते 2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 5 ते 9 जागा मिळतील. याशिवाय ZPM ला 15 ते 25 जागा आणि MNF पक्षाला 10-14 जागा मिळतील
ABP- सी वोटरच्या सर्वेनुसार मिझोरममध्ये भाजपला 0 जागा मिळतील. तर काँग्रेसला 2 ते 8 जागा मिळतील. याशिवाय ZPM ला 12 ते 18 जागा आणि MNF पक्षाला 15-21 जागा मिळतील
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT