राज्यपालांनीच बेकायदेशीर निकाल दिला, तेथे सरकार कायदेशीर कसे?; संजय राऊतांचे रोखठोक सवाल

मुंबई तक

Sanjay Raut: शिवसेना (UBT) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी विशेष लेखातून राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. एवढंच नव्हे तर कोर्टाने दिलेल्या निकालाबाबत काही गंभीर सवालही उपस्थित केले आहेत.

ADVERTISEMENT

governor himself gave an illegal verdict how can the government be legal sanjay rauts direct question
governor himself gave an illegal verdict how can the government be legal sanjay rauts direct question
social share
google news

मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबद्दल (Maharashtra Politcal Crisis) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जो निकाल दिला त्याबाबत शिवसेना (UBT) सुरुवातीलाच काही सवाल उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. असं असताना आता शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना या मुखपत्रातील ‘रोखठोक’ या विशेष सदरातून कोर्टाच्या निकालाबाबत काही थेट प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच सरकारवर जोरदार टीकाही केली आहे. ‘जेथे राज्यपालांनीच बेकायदेशीर निकाल दिला, तेथे त्यांनी शपथ दिलेले सरकार कायदेशीर कसे?’ असं म्हणत राऊतांनी संपूर्ण निकालाबाबतच आता सवाल उपस्थित केले आहेत. (governor himself gave an illegal verdict how can the government be legal sanjay rauts direct question)

पाहा रोखठोकमध्ये संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं आहे:

सगळेच संपत आले आहे ही भीती थैमान घालत असताना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा आशेचा किरण दाखवला. महाराष्ट्रातील घटनाबाहय़ सरकार हा देशाच्या घटनेला लागलेला डाग आहे. हा डाग धुऊन काढणारा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला, पण काही घटना तज्ञांचे म्हणणे आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा सोयीचा अर्थ काढून महाराष्ट्राचे सत्ताधारी अंमलबजावणी करतील.

विधानसभेचे अध्यक्ष ज्या पद्धतीच्या मुलाखती देऊन वातावरण निर्मिती करीत आहेत तो सर्वच प्रकार सर्वोच्च न्यायालयास आव्हान देणारा वाटतो. “आपल्या देशाची राज्यघटना उदात्त आहे व ती तशीच राहील, पण राज्यघटनेच्या अंमलबजावणीचे अधिकार चुकीच्या लोकांच्या हाती गेले तर मोठे नुकसान होईल,” असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच व्यक्त केले होते. ते बहुधा आजच्या राज्यकर्त्यांसाठीच असावे. राज्यघटनेची अंमलबजावणी आज चुकीचे लोक करीत असल्याने देशात भयाचे व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या प्रकरणात न्या. चंद्रचूड यांच्या पाच सदस्य खंडपीठाने सांगितले, “उद्धव ठाकरे यांनी स्वखुशीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. अन्यथा त्यांची पुन्हा त्याच पदावर पुनर्स्थापना करणे सोपे झाले असते.” या एका ओळीतच संपूर्ण निकालपत्राचे सार सामावले आहे.

हे ही वाचा >> ‘…तर मी राजकारण सोडेन’, संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

ठाकरे यांनी नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा दिला नसता तर आज ते पुन्हा मुख्यमंत्री असते. तरीही मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस निकालाच्या दिवशी हसत हसत मीडियासमोर आले व म्हणाले, “पहा, न्यायालयाने आमच्याच बाजूने निकाल दिला, आम्ही जिंकलो!” त्या दिवशी शिंदे-फडणवीस हे एकमेकांचे अभिनंदन करीत होते. पेढे भरवीत होते. याचा अर्थ न्यायालयाचा निकाल समजूनही ते वेडाचे सोंग घेऊन पेडगावला निघाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp