Gram Panchayat Election 2023 LIVE : अजित पवार गटाच्या पॅनलवर पैसे वाटल्याचा आरोप
ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी अनेक ठिकाणी राजकीय नेते या निवडणुकांमध्ये थेट सहभागी आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ADVERTISEMENT
Gram Panchayat and Sarpanch Election : राज्यात आज 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी आज मतदान पार पडतेय. आज सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत हे मतदान पार पडणार आहे. तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी 6 नोव्हेंबरला होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढवली जात नसली तरी अनेक ठिकाणी राजकीय नेते या निवडणुकांमध्ये थेट सहभागी आहेत. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ADVERTISEMENT
अजित पवार गटाच्या पॅनलवर पैसे वाटल्याचा आरोप
Katewadi Gram Panchayat Elections : बारामती तालुक्यातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी या गावांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये बहुजन ग्रामविकास पॅनेलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांनी राष्ट्रवादी गटाच्या पॅनल कडून पैसे वाटल्याचा आरोप केलाय..तसेच उपमुख्यमंत्र्यांच्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था नसून जाणीवपूर्वक काही गाव पुढारी गावाला वेठीस धरून काम करीत असल्याचा आरोप देखील बहुजन ग्रामविकास पॅनलचे प्रमुख पांडुरंग कचरे यांच्याकडून करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गावामध्ये केलेल्या विकास कामांमुळे जनता आमच्या पाठीशी असल्याचा निर्धार राष्ट्रवादी पुरस्कृत जय भवानी माता पॅनलचे प्रमुख विद्याधर काटे यांनी केला.. उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असून मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर या ग्रामपंचायत मध्ये आमचाच झेंडा रोवला जाईल असे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं..तर पांडुरंग कचरे यांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावत त्यांच्याकडूनच पैसे वाटले गेले असल्याचा आरोप काटे यांनी केला…
हे वाचलं का?
बीड जिल्ह्यात 18 गावांचा ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार
Beed Gram Panchayat Election 2023 : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून बीड जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. या गावातून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही. यामुळे या ठिकाणची मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील 158 ग्रामपंचायत साठी मतदान होत असताना या 18 गावांमध्ये मात्र शुकशुकाट आहे. गेवराई तालुक्यातील महत्वाची मानली जाणारी धरावंटा येथे सात सदस्य आणि सरपंच पद हे ओबीसी पदासाठी जागा आसतानाही मराठा समजला पाठींबा देण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे या साठी निवडणूक होणार होती. परंतु ग्रामस्थांनी बैठक घेऊन या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले. आगामी काळातही ज्या निवडणुका होतील त्यामध्ये सहभागी होणार नसल्याच ग्रामस्थांनी निर्धार केला आहे.
शिंदखेडा तालुक्यातील मांडळ येथे दोन गटात वाद
Dhule Gram Panchayat Elections 2023 : शिंदखेडा तालुक्यातील मांडळ या ठिकाणी दोन गटात वाद झाला. मतदाराच्या चिठ्ठीवर उमेदवाराचे चिन्ह असल्याने दुसऱ्या गटातील उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने दोन गट समोरासमोर आले होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने वाद मिटला आहे.
ADVERTISEMENT
माझ्या डोळयादेखतच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं : आशा पवार
Katewadi Gram Panchayat Elections : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मातोश्री आशा पवार मतदान करण्यासाठी काटेवाडीतील मतदान केंद्रावर आल्या होत्या. माझं वय आता जास्त झालं आहे. त्यामुळे माझ्या देखतच अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा आशा पवार यांनी सर्वांसमोर बोलून दाखवली. तसेच, अजित पवारांवर जनतेचे प्रेम आहे, असंही त्या म्हणाल्या आहेत. बारामतीत अजित पवार विरूद्ध भाजप लढतं.
ADVERTISEMENT
पालघर जिल्ह्यातील टेंभी खोडावे ग्रामपंचायत सरपंचासह बिनविरोध
Palghar Gram Panchayat Elections : पालघर जिल्ह्यात आज 100 ग्रामपंचायतींसाठी निवडणुका होत असून यामध्ये 51 सार्वत्रिक तर 49 ग्रामपंचायतींमध्ये पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. 628 जागांसाठी तब्बल 2099 इतके उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यातील टेंभी खोडावे ही ग्रामपंचायत सरपंचासह बिनविरोध झाली आहे.
बुलढाण्यात 48 ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान
Buldhana Gram Panchayat Elections :बुलढाण्यात 48 ग्रामपंचायतींसाठी उत्साहात मतदान सुरू झालं आहे. सरपंच पदासाठी थेट मतदान असल्याने चुरस वाढली असून आमदार संजय रायमुलकर, आमदार श्वेता महाले , आमदार आकाश फुंडकर, आमदार राजेंद्र शिंगणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT