Harshavardhan Patil : ''सुप्रिया सुळेंच्या विजयात आमचा अदृष्य सहभाग'', हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान
Harshvardhan Patil News : खरं तर बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता. या निवडणुकीबाबत व्यासपीठावर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ''खासदार सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. सुप्रिया सुळे चार वेळा खासदार झाल्या आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी जयंत पाटीलांसी भेट व्हायची
आमचं भेटणं किंवा बोलणं व्हायचं
आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) आलो आहे
Harshvardhan Patil News : लोकसभा निवडणुकी दरम्यान हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये होते. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. या प्रवेशाच्या कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी मोठं विधान केले आहे. 'सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृष्य सहभाग होता', अशी कबुली हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. म्हणजेच महायुतीत असताना आपण सुनेत्रा पवारांऐवजी, सुप्रिया सुळे यांचंच काम केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे पाटलांच्या या विधानाची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. (harshvardhan patil big statement our invisible psrticipation in supriya sule victory join sharad pawar ncp indapur)
ADVERTISEMENT
इंदापूरमध्ये आज हर्षवर्धन पाटील यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश पार पडला. या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमावेळी शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी मोठं विधान केले.
हे ही वाचा : Arjun Khotkar : 'मुडदे पाडण्याच्या' विधानावर खोतकरांचा पलटवार, ''रावसाहेब दानवे काहीही...''
खरं तर बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांचा पराभव केला होता. या निवडणुकीबाबत व्यासपीठावर बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की, ''खासदार सुप्रिया सुळे या आमच्या भगिनी आहेत आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे. सुप्रिया सुळे चार वेळा खासदार झाल्या आहेत. आधी तीन वेळा जेव्हा त्या खासदार झाल्या, त्यावेळी त्यांच्या विजयात थोडंफार का होईना, आमचंही प्रत्यक्ष योगदान होतं. मात्र, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता'', अशी जाहीर कबूल हर्षवर्धन पाटलांनी दिली आहे.
हे वाचलं का?
पाटील पुढे म्हणाले की, ''मी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वी माझी आणि जयंत पाटील यांची जेव्हा जेव्हा भेट व्हायची, आमचं भेटणं किंवा बोलणं व्हायचं, आम्ही फोनवर बोलायचो तेव्हा जयंत पाटील मला म्हणायचे, तिकडे का थांबला आहात, त्याऐवजी इकडे या. कोणत्याही गोष्टीला वेळ लागतो. त्यानुसार आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये (शरद पवार) आलो आहे''.
हे ही वाचा : Gunaratna Sadavarte : पहिल्याच दिवशी Bigg Boss च्या घरात सदावर्ते ढाराढूर झोपले, कोंबडा आरवला तरी...Video व्हायरल!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT