‘PM मोदी तर देवालाही समजावतील ब्रम्हांडात..’ राहुल गांधी असं का म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देवाला देखील समजावून सांगू शकतात. अशी टोला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लगावला आहे. ते अमेरिकेत बोलत होते. यावेळी त्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे.
ADVERTISEMENT
सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका): ‘मला वाटतं जर पीएम मोदींना (PM Modi) देवासमोर बसायला सांगितलं तर ते देवालाही समजवून सांगतील की, ब्रह्मांडात काय चाललंय. देव देखील गोंधळून जाईल की, त्याने नेमकं काय निर्माण केलं आहे.’ अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आज (31 मे) मंगळवारी अमेरिकेत (America) केली आहे. राहुल गांधींनी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये निवासी भारतीयांची भेट घेतली आणि त्यांना संबोधित केले. यावेळी राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींचं नाव घेत त्यांच्यावर निशाणा साधला. (if you make modiji sit in front of god modi will explain to god how the universe was created rahul gandhi made such a taunt)
ADVERTISEMENT
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना म्हटलं की, ‘काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते काश्मीर अशी यात्रा सुरू केली होती. मी पण प्रवास करत होतो. तेव्हा मला जाणवलं की, आम्हाला राजकारणासाठी आवश्यक असलेल्या साधनांवर भाजप आणि RSS चे नियंत्रण आहे. लोकांना धमक्या दिल्या जात आहेत. तपास यंत्रणा वापरल्या जात आहेत. अशा परिस्थितीत भारतात राजकारण करणे आता सोपे राहिलेले नाही, असे आम्हाला वाटले. म्हणून आम्ही यात्रा करण्याचे ठरवले.
राहुल गांधींनी पीएम मोदींना लगावला टोला
राहुल गांधी म्हणाले की, ‘जग इतके मोठे आहे की कोणीही विचार करू शकत नाही की त्याला सर्व काही माहित आहे. खरं तर हा एक आजार आहे. भारतात असे काही लोक आहेत की ज्यांना वाटते त्यांना सर्वकाही कळतं. मला वाटते की त्यांना असं वाटतं की, त्यांना देवापेक्षा जास्त गोष्टी माहिती आहेत. ते देवासमोर बसून त्याला काय चालले आहे हेही समजावून सांगू शकतात. पीएम मोदी देखील त्यापैकी एक आहेत.’
हे वाचलं का?
राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘मला वाटतं जर पीएम मोदींना देवासमोर बसायला सांगितलं तर ते ब्रह्मांडात काय चाललंय ते देवाला समजावून सांगू लागतील. देव देखील त्याने काय निर्माण केले आहे याबद्दल गोंधळून जाईल. भारतात हेच चालू आहे. भारतात असे काही लोक आहेत ज्यांना जणू काही सर्व माहीत आहे. जेव्हा ते शास्त्रज्ञांकडे जातात तेव्हा ते त्यांना विज्ञानाबद्दल सांगतात, जेव्हा ते इतिहासकारांकडे जातात तेव्हा ते त्यांना इतिहासाबद्दल सांगतात. ते सैन्याला युद्ध, हवाई दलात उड्डाण करण्याबद्दल सर्व काही सांगतात. पण त्यांना काहीच कळत नाही हे सत्य आहे.’ असं म्हणत राहुल गांधी या पंतप्रधान मोदींवर टीकेची झोड उठवली आहे.
‘यात्रेत संपूर्ण भारत सोबत होता’
अमेरिकेत बोलताना राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेवर देखील बोलले, ‘यात्रा सुरू करताना वाटलं बघू काय होतंय? 5-6 दिवसांनी लक्षात आले की हजारो किलोमीटरचा प्रवास सोपा नाही. मला माझ्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रास होऊ लागला. पण आमच्याकडे पर्यायही नव्हता. आम्ही रोज 25 किलोमीटरचा प्रवास करत होतो. तीन आठवड्यांनंतर एक धक्कादायक गोष्ट घडली. मला जाणवलं की, मला अजिबात थकवा जाणवत नाहीए. मी माझ्याबरोबर चालणाऱ्या लोकांनाही विचारले की त्यांना थकवा जाणवतो का? तर ते देखील म्हणाले की, त्यांना थकवा येत नाही.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Crime: दोन व्हिडिओ कॉल अन् त्यानंतर… साक्षीच्या हत्येबाबत आरोपी साहिलकडून मोठा खुलासा
राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘आम्ही एकट्याने यात्रा करत नाही, याची आम्हाला जाणीव झाली होती. संपूर्ण भारत आमच्यासोबत प्रवास करत आहे. जेव्हा तुम्हाला लोकांचं प्रेम मिळतं तेव्हा तुम्ही खचून जात नाही. एकत्र चालल्यावर थकवा येत नाही. द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचं दुकान उघडलं.’
ADVERTISEMENT
‘आमच्याबाबत चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला सर्वांशी आपुलकी होती. ज्याला काही बोलायचे होते, जे काही बोलायचे ते आम्हाला देखील ऐकायचे होते. आम्ही नाराज होत नव्हतो. आम्ही त्यांच्यावर प्रेम करत होतो.’ असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
‘यात्रा थांबवण्याचा प्रयत्न झाला’
यावेळी राहुल गांधींनी असाही आरोप केला की, ‘त्यांनी (भाजप) आमची भारत जोडो यात्रा रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांनी पोलीस आणि एजन्सीचा वापर केला. पण ते सर्व प्रयत्नात अपयशी ठरले. तुम्ही सर्वांनी आम्हाला मदत केली, त्यामुळे आमच्या विरोधात काहीही चालू शकलं नाही.’
आपले भाषण संपल्यानंतर राहुल यांनी लोकांना सांगितले की ते प्रश्न विचारू शकतात आणि त्यांचे मत मांडू शकतात. पुढे ते असंही म्हणाले की, हे भाजपच्या सभांमध्ये होत नाही.
महिला आरक्षण आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर राहुल काय म्हणाले?
यावेळी राहुल यांना महिला आरक्षण आणि सुरक्षेबाबत विचारले असता त्यांनी उत्तर दिले की, आम्हाला महिला आरक्षणाबाबत विधेयक आणायचे होते. पण आमच्या काही मित्रपक्षांना ते मान्य नव्हते आणि आम्ही तसे करू शकलो नाही. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर हे विधेयक नक्कीच मंजूर करू.’
‘महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, जर आपण महिलांचे सक्षमीकरण केले, महिलांना सरकारमध्ये वाटा दिला, त्यांना व्यवसायात स्थान दिले, त्यांना अधिकार दिले, तर त्यांना आपोआप सुरक्षा मिळेल.’ असं राहुल गांधी म्हणाले.
मुस्लिमांवरील अत्याचाराशी संबंधित प्रश्नावर राहुल गांधी काय म्हणाले?
मुस्लिम समाजावरील अत्याचाराच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, ‘द्वेषाच्या बाजारात आम्ही प्रेमाचे दुकान उघडू. मुस्लिमांवर जास्त हल्ले होत असल्याची भावना आहे. पण शीख, दलित, आदिवासी या सर्वांना देखील आता तसंच वाटत आहे. सगळे तेच विचारत आहे की, काय चाललंय? मुस्लिमांना ते अधिक जाणवते कारण त्यांच्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे.’
हे ही वाचा >> Sex Racket: ‘डार्क रुम’मध्ये ‘डर्टी पिक्चर’.. कुठे सुरू होतं खुलेआम सेक्स रॅकेट?
‘पण आपण द्वेषाला द्वेषाने पराभूत करू शकत नाही. आपण द्वेष प्रेमाने घालवू. भारत द्वेषावर विश्वास ठेवत नाही. मीडिया, एजन्सी आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवणाऱ्या लोकांचा एक छोटा गट आहे, जो द्वेषावर विश्वास ठेवतो. आज भारतात मुस्लिमांसोबत जे घडत आहे तेच भारतात आणि विशेषतः उत्तर प्रदेशात दलितांसोबत होत आहे. पण आम्ही त्याला आव्हान देऊ, लढू.’ असं राहुल गांधी यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT