INDIA vs NDA : रणनीती ठरली! 11 नेते, सचिवालय… आता मुंबईत बैठक

मुंबई तक

आता ते सगळे तुकडे पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. याचाच अर्थ असा की नरेंद्र मोदी विरोधकांना घाबरले आहेत”, असं टीकास्त्र मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधानांवर डागलं.

ADVERTISEMENT

Rahul Gandhi said said that this fight is against the ideology of BJP. This is a fight between NDA and 'INDIA'.
Rahul Gandhi said said that this fight is against the ideology of BJP. This is a fight between NDA and 'INDIA'.
social share
google news

Opposition Unity India : देशात 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध इंडिया अशी राजकीय लढत बघायला मिळणार आहे. एकीकडे दिल्लीत भाजप प्रणित एनडीएची बैठक सुरू असताना 26 विरोधकांच्या आघाडीला नवं नाव निश्चित करण्यात आलं. इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुसिव्ह अलायन्स या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, बंगळुरूत झालेल्या बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली.

पाटण्यातील बैठकीनंतर 26 विरोधी पक्षांच्या नेत्यांची बंगळुरूत बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि विरोधकांच्या बैठकीचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुसिव्ह अलायन्स म्हणजे इंडिया या नावाची घोषणा केली. विरोधी पक्षांत समन्वय राहावा, किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यासाठी एक समिती आणि कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. एनडीए विरोधात लढा देण्यासाठी तयार केलेल्या रणनीतीवर आता मुंबईत होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

वाचा >> Kirit Somaiya यांच्या आक्षेपार्ह Video प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची सभागृहात ‘ती’ मोठी घोषणा

या बैठकीनंतर बोलताना मल्लिकार्जून खरगे यांनी माहिती दिली. “सोनिया गांधी, नितीश कुमार, लालू प्रसाद यादव यांच्यासह 26 पक्षांचे नेते बैठकीला हजर होते. लोकशाही आणि संविधान वाचवण्याच्या दृष्टीने ही बैठक खूप महत्त्वाची होती. काही ठराव या बैठकीत मांडण्यात आले, या सर्वांनी ते मंजूर केले. या आघाडीसाठी नवे नाव सुचवण्यात आले, ज्याला सर्वांनी पाठिंबा दिला”, असं त्यांनी सांगितलं.

‘इंडिया’ची पुढची बैठक मुंबईत

“आधी युपीए म्हणून काम केले. आता 26 पक्षांनी नवीन नाव दिले असून, इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इनक्लुझिव्ह अलायन्स म्हणजे इंडिया. सर्वांनी एकमताने हे नाव निवडलं आहे. 11 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात येईल. ते लवकरच निवडले जातील. ‘इंडिया’ची पुढील बैठक मुंबईत होणार आहे. त्याच बैठकीत समन्वय समितीतील नेत्यांची नावे जाहीर करण्यात येतील. बैठकीची तारीख लवकरच जाहीर करू”, अशी माहिती खरगे यांनी यावेळी दिली.

हे वाचलं का?

    follow whatsapp