Rajya Sabha Election 2024 : ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीप पाळावा लागणार?
महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत आमदारांनी कुणाला मतदान करावं याबद्दल व्हीप काढला जाऊ शकतो, त्यामुळे ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीप लागू होईल का?
ADVERTISEMENT

Maharashtra Rajya sabha Election 2024 : लोकसभेच्या निवडणुकांना अवघे काही महिने उरलेत. पण, आता लोकसभेच्या आधी महाविकास आघाडी आणि महायुतीची कसोटी लागणार आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकांसाठी निवडणूक जाहीर झाली असून, 27 फेब्रुवारीला 6 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
आता या निवडणुकीत कोणाचे उमेदवार विजयी होतील, हे निकालानंतर कळेलच, पण या निवडणुकीत ठाकरेंच्या आमदारांची अडचण होणार का? ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंना व्हिप लागू होणार आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हेच सगळं समजावून घेऊयात…
लोकसभेच्या आधी महाराष्ट्रात एक महत्त्वाची निवडणूक येऊ घातली आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेचे सहा खासदारांचा कार्यकाळ संपतोय. या जागांसांठी आता 27 जूनला निवडणूक होणार आहे.
कोणत्या खासदारांचा संपणार कार्यकाळ?
यामध्ये शिवसेनेचे (ठाकरे) अनिल देसाई, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण, काँग्रेसचे कुमार केतकर, भाजपचे नारायण राणे, प्रकाश जावडेकर आणि मुरलीधरण यांची टर्म संपते आहे. या सहा खासदारांची टर्म संपत असल्याने यांच्या जागांवर आता निवडणूक होणार आहे.