Manoj Jarange : 'जरांगेंचा कुणाशी संबंध आहे हे महाराष्ट्राला...', पवारांवरील आरोपावर जयंत पाटलांच प्रत्युत्तर

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

शरद पवारांचा आणि त्यांचा संबंध आला नाही, उलट त्यांचा संपर्क कुणाशी आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी उत्तर दिले आहे.
jayant patil reply on sharad pawar manoj jarange phone call allegation sangita wankhede maratha reservation
social share
google news

Jayant patil on sharad pawar manoj jarange Allegation : 'शरद पवारांचा जरांगेंना फोन यायचा...आंदोलनाचा खर्च देखील शरद पवारच करायचे' असा खळबळजनक आरोप मराठा सहकारी संगीता वानखेडे हिने मराठा आंदोलक जरांगे पाटलांवर (manoj jarange) केला होता. या आरोपांवर आता शरद पवार  (sharad pawar) गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शरद पवारांचा आणि त्यांचा संबंध आला नाही, उलट त्यांचा संपर्क कुणाशी आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी (Jayant patil) उत्तर दिले आहे. (jayant patil reply on sharad pawar manoj jarange phone call allegation sangita wankhede maratha reservation) 

ADVERTISEMENT

जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी संगीता वानखेडे यांनी जरांगेंवर केलेल्या आरोपावर प्रश्न विचारला होता. यावर जयंत पाटील म्हणाले की, अजिबात नाही, कधीही शरद पवारांचा आणि त्यांचा संबंध आला नाही, उलट त्यांचा संपर्क कुणाशी आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती असावं, असा माझा अंदाज आहे. मी त्यावर आरोप केले की पुन्हा चर्चा सूरू होईल. त्यामुळे तसा कोणताही संबंध नाही, असे जयंत पाटलांनी स्पष्ट केले.

संगीता वानखेडेंचे आरोप काय? 

संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केला आहे. 'हा लढा आरक्षणासाठी उभारला होता. मग आता स्वतंत्र आरक्षण मिळालंय, कायद्यात टीकून राहणारा आरक्षण मिळालंय, ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनाही ओबीसीतून आरक्षण मिळतेय ना, मग हा अट्टाहास कशासाठी? असा खडा सवाल यावेळी संगीता वानखेडे यांनी उपस्थित केला. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Pankaja Munde: बीड लोकसभा निवडणुकीबाबत पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

'मी मराठा समाजाची सहकारी होते. जो मराठा समाजासाठी आवाज उठवेल त्याच्यासाठी मी स्वत: उभी राहायची असे संगीता वानखेडेने सांगितले. तसेच 'मी एक महिन्यापूर्वी त्यांच्यासोबत होते. हा माणूस चुकतोय, समाजाची दिशाभूल करतोय, समाजाला गोंधळात टाकतोय, त्यामुळे याचा चेहरा आता समाजापुढे आला पाहिजे, यासाठी मी माध्यमांसमोर आल्याचे' संगीता वानखेडे सांगतात. 

'जरांगेंनी महाराष्ट्राला वेड बनवलं आहे. अंतरावली सराटीत दंगल घडली की घडवली गेली, याचा सरकारने शोध घ्यावा', असा संशय देखील संगीता वानखेडेंनी व्यक्त केला. तसेच 'जरांगे मराठा समाजाला अजिबात विश्वासात घेत नव्हते, ते फक्त त्या एका फोनलाच विश्वासात घ्यायचे, शरद पवारांचाच फोन त्या माणसाला यायचा, आंदोलनाचा खर्चही शरद पवारांनीच केला होता', असा खळबळ उडवून टाकणारा आरोप देखील संगीता वानखेडे यांनी केला. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Ruby Franke : मुलांना उपाशी ठेवून Youtube वर द्यायची लोकांना धडे

जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवारच का असे पत्रकारांनी विचारले असता, संगीता वानखेडे म्हणाल्या, जरांगेंनी ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा लढा उभारला तेव्हा त्यांना सर्वपक्षीय नेते भेटायला गेले होते. मात्र यांनी कोणत्याच पक्षाच्या नेत्याबाबत मनापासून प्रतिक्रिया दिली नाही. पण ज्यावेळेस शरद पवार आंदोलनस्थळी गेली, त्यावेळेस त्यांच्याबाबत जी आत्मियता होती, जे प्रेम उफाळून येत होते, ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले असल्याचे संगीती वानखेडे यांनी सांगितले. त्यामुळेच या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा आरोप संगीता वानखेडे यांनी केला आहे. 
 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT