Pankaja Munde: बीड लोकसभा निवडणुकीबाबत पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

पंकजा मुंडे बीडमधून निवडणूक लढवणार?
पंकजा मुंडे बीडमधून निवडणूक लढवणार?
social share
google news

Pankaja Munde Lok lok sabha election 2024 : योगेश काशिद, बीड: भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. पण याच चर्चेबाबत जेव्हा पंकजा मुंडे यांना विचारण्यात आलं. तेव्हा त्या म्हणाल्या की, 'बीडची लोकसभा नेमकं कोण लढवणार हे पक्षातले श्रेष्ठी ठरवतील.' (why did bjp leader pankaja munde say this about beed lok sabha election 2004)

बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेण्यात आली आणि या बैठकीनंतर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

'लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सध्या भाजपकडून बूथ रचना केली जात आहे आणि या कामाला कार्यकर्त्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पंकजा मुंडे म्हणाले आहेत. 2014 आणि 19 मध्ये याच कार्यकर्त्यांनी माझ्या बाजूने चांगलं काम केलं होतं. त्यामुळे उमेदवार कोण असेल हे येणाऱ्या काळात निश्चित होईल.' अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Manoj Jarange : 'शरद पवारांचा फोन यायचा, आंदोलनाचा खर्चही...',

'कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनाचा निवडणुकांवर धोकादायक परिणाम होणार नाही'

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न पेटलेला आहे आणि याचा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर पाहिजे तेवढ्या प्रमाणात धोकादायक परिणाम होणार नाही. असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. राज्य सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाला मराठा समाजाने विरोध केला आहे यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठा समाजाने ठरवावे किती त्यांना आरक्षण हवं आहे की नाही.. यावर अनेकदा मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे..

हे ही वाचा>> पवारांचा डाव.. दादांची कोंडी, कोण आहेत युगेंद्र पवार?

महिला स्पष्ट आणि सत्याचं राजकारण करतील..

'राजकारणात येणाऱ्या महिलांसाठी येणारा काळ चांगला आहे. कारण येत्या काळात महिलाच या स्पष्ट आणि सत्याचं राजकारण करतील..' असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. तर येणाऱ्या काळात एकट्याची ताकद जगाला दाखवून द्यावी लागेल. असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT