Jitendra Awhad : ‘काकाच्या मृत्यूची वाट बघताय’, अजित पवारांमुळे आव्हाडांचा चढला पारा

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

jitendra awhad reply ajit pawar over sharad pawar criticize ncp politics loksabha election maharashtra politics
jitendra awhad reply ajit pawar over sharad pawar criticize ncp politics loksabha election maharashtra politics
social share
google news

लोकसभा निवडणूकीआधी तुम्हाला भावनिक करतील, शेवटची निवडणूक असल्याचे सांगतील. खरंच त्याची शेवटची निवडणूक कधी असेल माहित नाही. पण मतदारांनो तुम्ही भावनिक होऊ नका, असे विधान करून अजित पवारांनी शरद पवारांना डिवचलं होतं. अजित पवारांच्या (Ajit pawar) याच विधानाचा समाचार आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाडांनी (jitendra awhad) घेतला आहे. ‘काकाच्या मृत्यूची वाट बघतोय… हे राजकारण आहे का अजित पवार?’ असा सवालच आव्हाडांनी त्यांना केला आहे. (jitendra awhad reply ajit pawar over sharad pawar criticize ncp politics loksabha election maharashtra politics)

काय म्हणाले आव्हाड?

जितेंद्र आव्हाड एबीपी माझावर बोलत होते. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिले. ‘एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे. हे माणूसकीला शोभणारे आहे का?’ असा संताप जितेंद्र आव्हाडांनी व्यक्त करत, याचा विचार अजित पवारांनी जरूर करावा, असा सल्ला दिला.

हे ही वाचा : भाऊच भावाच्या जीवावर उठला, 9 वर्षाच्या भावाला डोकं फोडून का संपवलं?

‘अजित पवारांनी आजच हद्दच ओलांडली. आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघतोय, हे राजकारण आहे का अजित पवार? भावनिक आवाहन करताय. महाराष्ट्रालाही कळेल काय माणूस आहे हा’, अशी टीका आव्हाडांनी अजित पवारांवर केली. तसेच’ काय माहित कधी असेल शेवटची निवडणूक. पण शरद पवार अजरामर राहतील, महाराष्ट्रात त्यांनी केलेले योगदान अजरामर राहिल’, असे देखील आव्हाडांनी सांगितले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘आपली उंची ओळखा कुठे शरद पवार आणि कुठे तुम्ही? अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग हे देखील नाव काढतात. लाज वाटते मला तुमच्यासोबत काम केल्याची आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही, असा हल्ला देखील आव्हाडांनी अजित पवारांवर केला. तसेच ‘ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता असल घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितलं नाही’, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

हे ही वाचा : Lok Sabha : 38 विरुद्ध 62… प्रशांत किशोरांनी सांगितला भाजपला हरवण्याच्या फॉर्म्युला

अजित पवारांचे विधान काय?

बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच आपला उमेदवार जाहीर करेन. मी उमेदवार समजून मला मतदान केलं पाहिजे, अशी तंबी कार्यकर्ते आणि मतदारांना देतानाच, काही लोक भावनिक होतील, माझी शेवटची निवडणूक आहे असं सांगतील, पण खरंच ती शेवटची निवडणूक असेल का? असा सवाल करत अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात फटकेबाजी केली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT