Sharad Pawar : “काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार…”, आव्हाडांनी इतिहासच काढला
Jitendra Awhad Ajit Pawar News : शरद पवार यांच्यावर अजित पवारांनी टीका केली. अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर आक्षेप घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला.
ADVERTISEMENT
Jitendra Awhad Ajit Pawar Sharad Pawar Ncp : ‘मी 60 वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती’, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. काही दिवसांपूर्वी केलेल्या या विधानावरून आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला. जितेंद्र आव्हाडांनी इतिहास घडून गेलेल्या या राजकीय घटनेचा सगळा घटनाक्रम सांगत अजित पवारांच्या नेतृत्वावरच हल्ला चढवला.
ADVERTISEMENT
2 जुलै 2023 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक मोठा गट सत्तेत सामील झाला. तेव्हापासून अजित पवार सातत्याने शरद पवारांवर आणि त्यांच्या नेतृत्वावर हल्ले करताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात अजित पवारांनी पुन्हा एकदा शरद पवारांच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या राजकीय घटनेबद्दल भाष्य केले.
वसंतदादांचं सरकार, जनता पक्षाचा पाठिंबा
“मी 60 वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली. काहींनी (शरद पवार) 38 व्या वर्षी वेगळी भूमिका घेतली होती. यशवंतराव चव्हाण यांचा याला विरोध होता. वसंतदादा पाटील हे चांगलं नेतृत्व होते, तरी त्यांना बाजूला करण्यात आलं आणि जनता पक्षालाबरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्यात आली”, असे अजित पवार म्हणाले.
हे वाचलं का?
हेही वाचा >> खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?
अजित पवारांनी केलेल्या याच विधानानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून पहिली प्रतिक्रिया उमटली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना या राजकीय घटनेचा सगळा इतिहास सांगितला. इतकंच नाही, तर त्यांच्या राजकीय कर्तृत्वावरही प्रश्न उपस्थित केले.
राष्ट्रवादीतील वाद : जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांना काय दिले उत्तर?
जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमधून अजित पवारांना उत्तर दिलं. जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, ते आधी वाचा…
ADVERTISEMENT
“साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा ते 38 वर्षांचे होते. पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद, या आघाडीची कल्पना ही समाजवादी नेते एस.एम. जोशी यांनी पुढे आणली. नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा होती. पण, त्या काळात दिल्लीच्या हायकमांडमध्ये नाशिकराव तिरपुडेंचा दबदबा होता. अशा परिस्थितीत काहीतरी केलं पाहिजे, असे सर्वच पुरोगामी नेत्यांना वाटत होते. अन् यशवंतराव चव्हाणांनी मान हलवल्यानंतरच पुढील घडामोडी घडल्या.”
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘वंचित’ने सांगितलं किती हव्यात जागा? मांडला ‘मविआ’चा फॉर्म्युला
“यामध्ये सर्वात मोठी भूमिका एस.एम. जोशी यांची असल्याकारणाने त्यांनी शरद पवार साहेब यांचे नाव सुचविले. त्यावेळेस असलेल्या जनता पार्टीची निर्मिती ही जयप्रकाश नारायण यांनी केली होती. अन् जनसंघ हादेखील जनता पार्टीत विलीन केला होता. जनसंघाचे अस्तित्व संपले होते आणि भारतीय जनता पार्टीची निर्मिती व्हायची होती. त्यामुळे कुठलाही जातीयवादी पक्ष हा पुलोदचा भाग नव्हता. अर्धवट माहितीच्या आधारे साहेबांवर आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की साहेबांनी कधीच जातीयवादी पक्षांशी हातमिळवणी केली नाही. कारण की, सन 1981 मध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. त्या आधीच पुलोदचे सरकार बरखास्त होऊन दुसरे सरकार सत्तेवर आले होते. त्यामुळे अजितदादांनी स्वतःची तुलना साहेबांच्या निर्णयाशी करावी, हे जरा हास्यास्पदच वाटतेय.”
“एवढ्या सर्व लोकांना विश्वासात घेऊन मुख्यमंत्री होणे आणि समान तत्वावर सरकार चालवणे, ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळेस उद्धवराव पाटील, कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील, एस .एम. जोशी, ना. ग. गोरे असे दिग्गज नेते महाराष्ट्राच्या राजकारणात होते.”
हेही वाचा >> “…मग मोदी तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही”, आंबेडकरांचा ‘इंडिया’ला मेसेज
“स्वकर्तृत्वावर तयार झालेले शरद पवार आणि काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार यांच्यात बरंच अंतर आहे. त्यामुळे साहेबांनी ज्या वयात केले; त्या वयात तुम्हाला ते करताही आले नसते आणि त्यांनी जे केले ते तुम्हाला 63 व्या वर्षीही जमले नाही. तुम्ही कितीही शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांचे नाव घेतले तरी उजव्या मांडीवर कोण आणि डाव्या मांडीवर कोण, हे महाराष्ट्रातील प्रत्येक पुरोगामी माणसाला कळतंय.”
साहेब जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा ते 38 वर्षांचे होते. पुरोगामी लोकशाही दल म्हणजेच पुलोद, या आघाडीची कल्पना ही समाजवादी नेते एस.एम. जोशी यांनी पुढे आणली. नाशिकराव तिरपुडे हे वसंतदादांना देत असलेल्या त्रासाबद्दल मंत्रिमंडळात उघड चर्चा होती. पण, त्या काळात…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 27, 2023
“आधी थोडीशी माहिती करून घेतली असती तर अशी गल्लत झाली नसती आणि या सर्व प्रकरणाला स्वर्गीय मा. यशवंतराव चव्हाण यांची मान्यता होती. तेव्हा राजकारण म्हणजे साखर कारखाना; राजकारण म्हणजे बँका ; राजकारण म्हणजे इथेनॉल फॅक्टरी ; राजकारण म्हणजे सहकारी उद्योग असे समीकरण तेव्हा नव्हते तर महात्मा गांधीजींचा वारसा घेऊन चाललेले नेते हे समाजसेवेचे व्रत घेऊन पुढे जात होते. हाच आजच्या आणि तेव्हाच्या राजकारणातला फरक आहे”, असे आव्हाडांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT