भाजपच्या मिशनमुळे शिंदेंचं वाढलं टेन्शन! जेपी नड्डांची बालेकिल्ल्यात सभा
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने युती करत राज्यात सरकार स्थापन केलंय. मात्र, आता भाजपमुळेच शिंदे गटाचं (बाळासाहेबांची शिवसेना) टेन्शन वाढलंय. भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 144 निश्चित केलंय. यात महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. महत्त्वाचं खरी शिवसेना म्हणवणाऱ्या शिंदे गटाच्या बाल्लेकिल्ल्यावरच भाजपनं दावा ठोकलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची याच बाल्लेकिल्ल्यात म्हणजे […]
ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपने युती करत राज्यात सरकार स्थापन केलंय. मात्र, आता भाजपमुळेच शिंदे गटाचं (बाळासाहेबांची शिवसेना) टेन्शन वाढलंय. भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी मिशन 144 निश्चित केलंय. यात महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांचाही समावेश आहे. महत्त्वाचं खरी शिवसेना म्हणवणाऱ्या शिंदे गटाच्या बाल्लेकिल्ल्यावरच भाजपनं दावा ठोकलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची याच बाल्लेकिल्ल्यात म्हणजे औरंगाबादेत सभा होतेय. त्याचे वेगवेगळे अर्थ काढले जाताहेत.
2024 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसलीये. भाजपनं मिशन 144 निश्चित केलंय. त्यासाठी प्रत्यक्ष स्थानिक पातळीवर पक्ष बांधणीही सुरू केलीये. भाजपच्या मिशन 144 मध्ये महाराष्ट्रातील 16 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यातीलच एक आहे, औरंगाबाद.
औरंगाबादमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची सभा होतेय. औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सायंकाळी 5 वाजता जेपी नड्डा यांची सभा होणार आहे. त्याचबरोबर चंद्रपूरमध्येही नड्डांची सभा होणार आहे. पण, चर्चा होतेय ती औरंगाबादेतील सभेची.
J. P. Nadda महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; बारामतीच्या करेक्ट कार्यक्रमासाठी कानमंत्र देणार?