कर्नाटक निकालानं CM शिंदेंना इशारा; ‘त्या’ बंडखोर आमदारांचं झालं तरी काय?
CM Eknath Shinde: कर्नाटकचा निकाल हा भाजपसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत बंडखोरी केलेल्या 50 आमदारांसाठी कर्नाटकचा निकाल हा धोक्याची घंटा आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे ती कर्नाटकाच्या विधानसभा निवडणूक निकालाची. (Karnataka Vidhansabha Election) कर्नाटकाच्या निवडणुकीमध्ये 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने (Congress) सत्ता काबीज केली आहे. काँग्रेससाठी हा मोठा विजय मानला जात आहे. पण या विजयाबरोबरच आणखी एक चर्चा आहे ती म्हणजे 2019 मध्ये काँग्रेससोबत बंडखोरी केलेल्या 13 आमदारांची. 2019 मध्ये काँग्रेसचं सरकार पाडून भाजपसोबत गेलेल्या त्या 17 आमदारांचं नेमकं काय झालं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना हा कसा इशारा आहे हेच आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. (karnataka vidhansabha election result but warning for cm eknath shinde what happened with karnataka rebel mlas)
ADVERTISEMENT
सगळ्यात आधी आपण कर्नाटकमधली पार्श्वभूमी समजावून घेऊया. तसंच त्याचा महाराष्ट्राशी कसा संबंध आहे ते सुद्धा जाणून घेऊया. कर्नाटकमध्ये 2018 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. अशावेळी काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत एक वेगळं सरकार स्थापन केलं होतं. यावेळी काँग्रेसच्या पाठिंब्यावर जनता दल सेक्युलरचे कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झाले होते. सरकार स्थापन होऊन 14 महिने झालेले असताना 17 आमदारांच्या बंडामुळे हे सरकार कोसळलं. या 17 आमदारांमध्ये काँग्रेसच्या 13, जेडीएसच्या 3 तर 1 कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टीचा आमदाराचा समावेश होता.
या 17 आमदारांच्या बंडामुळे काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार कोसळलं. या आमदारांना त्यावेळच्या विधानसभा अध्यक्षांनी अपात्र केलं. त्यानंतर या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश करुन पोटनिवडणूक लढवली. या पोटनिवडणुकीत निवडून येत या आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> ‘त्या 16 आमदारांचा निकाल…’, अजित पवारांच्या विधानाने उंचावल्या भुवया
नुकत्याच झालेल्या कर्नाटकाच्या निवडणुकीत भाजपने या बंडखोर 17 पैकी 14 आमदारांना उमेदवारी दिली होती. या 14 उमेदवारांपैकी काँग्रेसच्या बंडखोर 8 आमदारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भाजप आणि बंडखोर आमदारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. कर्नाटकच्या जनतेनेला ही बंडखोरी आवडलेली नसून जनतेने या बंडखोर आमदारांना घरी बसवल्याचं चित्र आहे.
निकाल कर्नाटकचा, महाराष्ट्रातील बंडखोर आमदारांना धोक्याची घंटा?
दरम्यान, कर्नाटकमधील जनतेने दिलेल्या या निर्णयाचा परिणाम हा आता महाराष्ट्रात देखील होण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांना सोबत घेत शिवसेनेत बंडखोरी केली. एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. या सत्तासंघर्षाचा निकाल काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला. एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांना घ्यायचा आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे बंडखोर आमदार अपात्र झाले तर त्याचा मोठा फटका शिंदेंना बसू शकतो. त्यातच येत्या निवडणुकांमध्ये कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेनं बंडखोर आमदारांना नाकारलं तर त्याचे मोठे परिणाम शिंदे सरकारवर होऊ शकतात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Karnataka : डीके शिवकुमार यांचे भाकीत ठरलं खरं! 128 दिवसांपूर्वी म्हणाले होते…
आता शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर हे आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असं सातत्याने ठाकरे गटाकडून जाहीर भाषणांमधून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर बंडखोर आमदारांनी केव्हाही निवडणुका घ्यावात आम्ही जिंकून दाखवू असं देखील ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते म्हणत आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT